ST Strike : खासगी, सेवानिवृत्त चालकांच्या भरवशावर एसटीनं बदलला गिअर!

एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीवर हजारो कर्मचारी अजूनही ठाम आहेत.
ST Employee strike
ST Employee strikeSarkarnama

मुंबई : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीवर हजारो कर्मचारी अजूनही ठाम आहेत. जवळपास अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने एसटीचे आतापर्यंत 1200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण आता एसटीने नुकसान कमी करण्यासाठी खासगी व सेवानिवृत्त चालकांवर भरवसा दाखवत संपावरील कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.

एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखऱ चन्ने (Shekhar Channe) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतचे संकेत दिले आहेत. मागील काही दिवसांपासून संपावरील कर्मचारी (ST Employee strike) पुन्हा सेवेत दाखल होत असल्याचे सांगत चन्ने म्हणाले, राज्यातील 250 डेपोपैकी 215 डेपो सुरू झाले आहेत. सुमारे 26 हजार 500 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सुमारे 92 हजार कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार 123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.

ST Employee strike
आयोगाचा दणका; भाजपसह काँग्रेसच्या 18 नेत्यांना निवडणूक लढण्यास बंदी

राज्यात शुक्रवारी दिवसभरात लालपरीच्या 7 हजार फेऱ्या झाल्या असून 3 लाख 88 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे चन्ने यांनी सांगितले. बडतर्फ कर्मचाऱ्यांना परत कामावर घेता येत नाही. त्यामुळे अशी कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. कर्मचारी रुजू झाल्यानंतर बडतर्फीबाबत विचार होऊ शकते, असे आवाहनही चन्ने यांनी केले.

कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी तीनवेळा संधी देण्यात आली. त्यानंतर बरेच जण कामावर रुजूही झाले. ज्यांच्यावर कारवाई झाली नाही, त्यांनी लगेच रुजू व्हावे. रुजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. लोकांना सेवा देणं आवश्यक आहे , त्यामुळे खासगी चालक घेतोय. आतापर्यंत 400 चालक घेतले आहेत. आज 300 खासगी चालक घेतले जाणार आहेत. त्यांना केवळ एक महिन्यांसाठी घेण्यात आलं आहे. गरज पडल्यास त्यांना आणखी वाढवले जाईल. पण खासगी कंत्राटी चालक घेऊन कर्मचाऱ्यांना सोडण्याचा विचार नाही, असं चन्ने यांनी स्पष्ट केलं.

ST Employee strike
मुख्यमंत्री योगी 'खिचडी' खात असतानाच सात माजी आमदारांनी दिला झटका!

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैकी 400 जण यायला तयार आहेत. त्यापैकी 100 जण पात्र आहेत. त्यांनाही आपण सेवेत घेत आहोत. खासगी आणि निवृत्त चालक घेताना सगळ्या गोष्टींची तपासणी करून घेतले जात आहे, असं चन्ने यांनी सांगितले. दरम्यान, बंद काळात एसटीवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत पोलिसांत तक्रारी देण्यात आल्या असून आतापर्यंत 40 ते 50 गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन चन्ने यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com