दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना एसटीचा दणका; आज मध्यरात्रीपासून तिकिट महागलं

इंधनदरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायर तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.
ST Bus
ST Bus

मुंबई : इंधनदरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायर तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या (MSRTC) तिजोरीवर मोठा भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी (ST) महामंडळाने भाडेवाढ लागू केली. महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ (Ticket Price Hike) लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीला लागू होईल. आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून, ३ वर्षांनी एसटीचे तिकिट महागले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

महामंडळाने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीची भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी केले आहेत. यामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मागील ३ वर्षात इंधनदरात मोठी वाढ झाली आहे. हे दर वाढूनही एसटी महामंडळाने प्रवासी दर स्थिर ठेवले होते. इंधनाच्या वाढत्या दराचा बोजा सहन करीत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होती. परंतु, वाढत्या इंधनदराचा भार महामंडळाच्या तिजोरीवरही पडू लागल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

नवी तिकिट दरवाढ साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ असणार नाही. या गाड्यांच्या दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमीनंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

ST Bus
मंत्रिपुत्राची तब्येत बिघडली; डेंगीसोबत हाय शुगर अन् उपचारासाठी डॉक्टरांचे पथक

आज मध्यरात्रीपासून अथवा त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकिट आकारले जाणार आहे. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. उदयापासून हा अतिरिक्त दर रद्द करण्यात आला आहे. दिवसा व रात्री धावणाऱ्या बसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त होणार आहे.

ST Bus
जोतिरादित्य शिंदे गायब; भाजपच्या पोस्टरसह प्रचारातही दिसेनात!

एसटीने आज मध्यरात्रीपासून नवी भाडेवाढ लागू केली. यानुसार प्रति टप्पा (६ कि.मी.) साधी मिडीबसची ७ रुपये ४५ पैसे असणारी नियमित तिकीट आकारणी भाडेवाढीनंतर आता ९ रुपये ७० पैसे होईल. रात्रराणी बसची ९ रुपये ७० पैसे, निमआराम - विनावातानुकूलित शयन आसनी १२ रुपये ८५ पैसे असेस. शिवशाही १३ रुपये ३५ पैसे, शिवशाही स्लिपर १४ रुपये ३५ पैसे, वातानुकूलित शिवनेरी १९ रुपये ५० पैसे आणि वातानुकूलित शिवनेरी स्लिपर २३ रुपये असे दर असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com