नोकरीच धोक्यात: एसटीनं 2300 कर्मचाऱ्यांना बजावली सेवा समाप्तीची नोटीस

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीवर कर्मचारी अद्याप ठाम आहेत.
MSRTC
MSRTCSarkarnama

मुंबई : ठाकरे सरकारकडून एसटी महामंडळातील (MSRTC) कमर्चाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण एसटीचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीवर कर्मचारी (st workers) अद्याप ठाम आहेत. त्यामुळे आता महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. महामंडळाने बुधवारी तब्बल 2 हजार 296 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडित काढण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. त्यानुसार आता कारवाईचा बडगा सरकारनं उगारला आहे. एसटीमध्ये सध्या सुमारे 2600 कमर्चारी कार्यरत असून सुमारे 2300 जणांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना 24 तासांत कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. पण त्यानंतरही अनेक कमर्चारी रुजू झालेले नाहीत.

MSRTC
केवळ नेताजींमुळेच स्वातंत्र्य मिळालं, हे म्हणणं मूर्खपणाचं! कन्येनंच सुनावलं

''या कामगारांनी कामावर यायला हवं अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. बुधवारी ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल,'' असे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले होते.

MSRTC
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून शेतकऱ्यांना दोष देणं सोपं! सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरु आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी कामावर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाचे नेमणूकीचे कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

MSRTC
ठाकरे सरकारच्या मदतीला सलमान खान धावून येणार?

१ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने (High court) हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही कर्मचारी कामावर न परतल्याने एसटी महामंडळाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने विलीनीकरणासाठी समितीही स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल 12 आठवड्यांत सादर केला जाणार आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती -

संवर्ग कार्यरत संख्या नोटीस दिलेले कर्मचारी

चालक 29 25

चालक तथा वाहक 2188 2101

वाहक 182 132

सहाय्यक 97 22

लिपिक-टंकलेखक 88 16

एकूण 2584 2296

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com