शरद पवारांच्या मध्यस्थीनं एसटीचा संप मिटण्याची चिन्हे

संपामुळे दोन महिने राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा.
sharad pawar
sharad pawarsarkarnama

मुंबई : दोन महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत आज राज्य सरकार व एसटीच्या २२ संघटनांच्या कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे एसटीचा संप मिटण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ''एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,'' असे आवाहन पवार व परब यांनी यावेळी केले. ''कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही,'' असे परब यांनी सांगितलं.

शरद पवार म्हणाले, ''संपाबाबतच्या (msrtc employees) कृती समितीसोबत आज अनिल परब आणि सगळ्यांशी चर्चा झाली. एक सकारात्मक निर्णय घेण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल, पण एसटी सुरु झाली पाहिजे, याबाबत समितीत एकमत झाले. मला इथे राजकारण करायचं नाही. मला हा प्रश्न सोडवायचा आहे. कोणत्या राजकीय पक्षाने त्यांना घ्यायची आहे ती भूमिका घ्यावी, मी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आहे,'' ''प्रवाशी महत्वाचा आहे. संपामुळे दोन महिने राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा.

पवार म्हणाले, की कोरोनाचा नवा अवतार आपण गेले काही दिवस पाहात आहोत. कृती समितीच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या. ST चालू झाली पाहिजे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी सेवेत परत यायला हवं. कृती समितीमधील 22 संघटनांच्या प्रतिनिधींनी कामगार आणि प्रवाशांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. कामगार संभ्रमात होते म्हणून हा 2 महिन्यांचा वेळ लागला,''

sharad pawar
महापालिकेच्या स्थापनेनंतर १८ वर्षांनी मिळणार महापौरांना सरकारी निवासस्थान

''एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. त्यांचा शब्द वाया जाणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावे,'' असे आवाहन एसटीच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांकडून करण्यात आली. एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेण्याचे जाहीर आवाहन केले. शरद पवार यांनी एसटी संघटनांच्या प्रमुखांचीच भेट घेऊन मध्यस्थी केल्यानं हा संप मिटण्याची शक्यता आहे.

sharad pawar
कॉग्रेसचं ठरलं, स्वबळावर लढणार ; पटोलेंनी मागवली इच्छुकांची यादी

बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in