सदावर्तेंचा मुक्काम तुरूंगात अन् कर्मचाऱ्यांची 'एसटी'ला साथ

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू राहण्याचे आदेश दिले आहेत.
सदावर्तेंचा मुक्काम तुरूंगात अन् कर्मचाऱ्यांची 'एसटी'ला साथ
ST Strike |Gunratrna Sadavarte|Sarkarnama

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू राहण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे आता कर्मचारी कामावर परतू लागल्याने एसटी (MSRTC) मार्गावर आली आहे.

एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलनाचा शेवट सदावर्ते यांच्या अटकेने झाला. अन्य काही कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलकांनी आता परतीची वाट धरली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली. सध्या जवळपास 80 टक्के गाड्या मार्गावर आहेत. एकूण 9700 बस मार्गावर धावत असल्याचे त्यांनी सांगितले.

ST Strike |Gunratrna Sadavarte|
कुमार विश्वास अडचणीत; पोलीस थेट घरी पोहचले

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते, असा इशारा परब यांनी दिला आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नेतृत्वच नसल्याने कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले आहेत. मंगळवार (ता. 19) पर्यंत 82 हजार 108 पैकी 69 हजार 82 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

आता केवळ 13 हजार कर्मचारी कामावर रुजू व्हायचे आहेत. त्यांना आणखी दोन दिवसांची मुदत असल्याने तेही रुजू होऊ शकते. कर्मचारी रुजू होत असल्याने सध्या 80 ट्क्कयांहून अधिक बस मार्गावर धावत आहेत. एकूण 12 हजार 861 पैकी 9 हजार 768 बस मार्गावर आल्या आहेत. तर फेऱ्यांची संख्या 27 हजार 700 हून अधिक आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

ST Strike |Gunratrna Sadavarte|
राऊत, खडसे समाज विघातक; असा झाला फोन टॅपिंगचा प्लॅन

एसटीची सद्यस्थिती (19 एप्रिल)

विभाग हजेरी पटावरील कर्मचारी हजर

प्रशासकीय 12006 11701

कार्यशाळा 15791 13921

चालक 29485 23923

वाहक 24826 19537

एकूण 82108 69082

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.