MPSC
MPSC Sarkarnama

MPSC Exam Result : सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

MPSC Exam Result : जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम...

MPSC Exam Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या शंभर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या निकालात जळगावचा विशाल चौधरी हा प्रथम आला आहे. तर महिला वर्गवारीत सातारा जिल्ह्यातील शीतल फाळकेने घवघवीत यश मिळवित राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

MPSC
Vasant More : वसंत मोरेंबाबत मनसे अॅक्शन मोडवर; दोन दिवसात घेणार निर्णय...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)तर्फे दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी या संवर्गासाठी परीक्षा विभागातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीने पत्रकादवारे जाहीर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील विशाल चौधरी यांनी राज्यात आणि मागास वर्गवारीतून प्रथम क्रमांक मिळवला. तर सातारा जिल्ह्यातील शीतल फाळके यांनी महिला वर्गवारीतून पहिला क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहे. यावेळी अंतिम निकालासह प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ) प्रसिद्ध करण्यात आले.

MPSC
Pune News : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; पुणे महापालिकेतील 'या' दोन गावांची नगरपालिका होणार

याचवेळी एमपीएससीकडून संबंधित उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या, आरक्षण-प्रमाणपत्राचे दावे प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळल्यास, अर्जातील दाव्यानुसार प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास, अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. समांतर आरक्षण आणि अन्य मुद्द्यांबाबत न्यायालय, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com