मराठा आरक्षण लढ्यासाठी उदयनराजे, संभाजीराजेंना एकत्र आणणार...

मराठा आरक्षणाबाबत जागृती करण्यासाठी नरेंद्र पाटील यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. यासंदर्भात लोकसभा-राज्यसभेचे खासदार तसेच विधासभा व विधान परिषदेचे आमदार यांना त्यांनी नुकतीच वैयक्तिक पत्रे पाठवून आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
मराठा आरक्षण लढ्यासाठी उदयनराजे, संभाजीराजेंना एकत्र आणणार...
MP Udayanraje will bring Sambhaji Raje together for Maratha reservation fight ...

ढेबेवाडी :  मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje व खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनायक मेटे आदी नेतेमंडळींनी एका प्लॅटफॉर्मवर यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 'खासदार उदयनराजे भोसले यांची 'एन्ट्री' नेहमीच जबरदस्त असते. एकदा निर्णय घेतला की त्याचा निर्णय लागेपर्यंत ते मागे हटत नाहीत. त्या सर्वांनी एकत्र यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले असून आताही करत आहोत. आमची साद ते नक्की ऐकतील आणि लवकरच त्यांची एकत्रित एन्ट्री होईल, असा ठाम विश्वास आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद पाटील व्यक्त केला आहे. MP Udayanraje will bring Sambhaji Raje together for Maratha reservation fight ... 

'मराठा आरक्षणाच्या लढ्यात माझ्यासह राज्यातील अन्य ४२ कुटुंबांनी घरातील कर्ता माणूस गमावला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देवू नका. मराठ्यांच्या भावना समजावून घ्या, राजकारण  बाजूला ठेवून आरक्षणासाठी सर्वांनी  प्रयत्न करा.' अशी भावनिक साद यांनी राज्यातील सर्व आमदार व खासदारांना पत्राव्दारे घातली आहे.

मराठा आरक्षणाबाबत जागृती करण्यासाठी नरेंद्र पाटील यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. यासंदर्भात लोकसभा-राज्यसभेचे खासदार तसेच विधासभा व विधान परिषदेचे आमदार यांना त्यांनी नुकतीच वैयक्तिक पत्रे पाठवून आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, माझे वडील (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षणासाठी लढा उभारत २३ मार्च १९८२ रोजी पहिले  बलिदान दिले होते. त्यानंतर कोपर्डी येथील घटनेनंतर मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गायकवाड समितीच्या माध्यमातून १६ टक्के आरक्षण जाहीर केले. मराठा समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षा व सारथीच्या माध्यमातून खूप फायदा झाला. या समाजातील सुशिक्षित बेरोजगारासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करत आरक्षणाला समांतर फायदेही त्यावेळी शासनाने दिले. मात्र, अलिकडे सर्वोच्च न्यायालयात
आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजासमोर अडचणी वाढल्या आहेत. 

त्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणा बरोबरच समांतर योजनाही पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या पाहिजेत.मराठा समाजाला इथपर्यंत आणण्यासाठी अनेक मातब्बर मंडळींनी काम केले आहे व करीत आहेत. आपणही ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे व प्रत्यक्ष विनंती करावी.कायदेशीर बाजू भक्कम करून आरक्षण लढाई यशस्वी करण्यास साथ द्यावी असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.


 

Related Stories

No stories found.