Shrikant Shinde : विरोधकांना स्वप्नातही मुख्यमंत्री शिंदे दिसतात ; खासदार श्रीकांत शिंदेंचा टोला

Shrikant Shinde : ते २०-२० तास कसे काम करतात, हे विरोधकांच्या डोळ्यात खुपायला सुरवात झाली आहे. मी यापूर्वीही सांगितले आहे की,"ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है,"
Shrikant Shinde
Shrikant Shindesarkarnama

कल्याण : ठाकरे-शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन राजकारण पेटलं आहे. (Thackeray vs. Shinde latest news)

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या ठाणे-कल्याणच्या दौऱ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना टोला हाणला.

Shrikant Shinde
NCP : शरद पवारांचे मोदी सरकारला खुले आव्हान ; दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही !

श्रीकांत शिंदे म्हणाले, "राज्यात बहुमताने आलेले हे सरकार आहे. विरोधकांना आता काम नाही, सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे, विरोधकांना स्वप्नात देखील शिंदेसाहेब दिसत असतील. गणेशोत्सवात अनेकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. ते २०-२० तास कसे काम करतात, हे विरोधकांच्या डोळ्यात खुपायला सुरवात झाली आहे. मी यापूर्वीही सांगितले आहे की,"ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है,"

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा काल (शनिवारी) सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार करण्यात आला. संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. या सोहळ्याचा फोटो जयंत पाटलांनी टि्वट करीत आक्षेप घेतला आहे.

Shrikant Shinde
MNS : शिवसेनेला सत्तेचा माज आलायं.., जे पेरलं तेच उगवतयं ; मनसेनं डिवचलं

"मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही," असे म्हणत जयंत पाटलांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. वेगळा गट स्थापन केला. शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गटाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लळीत यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणे योग्य आहे का, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in