Shrikant Shinde News : निवडणूक येऊ तर द्या...आम्ही पण तयार आहोत; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Uddhav Thackeray News : प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama

Dombivli News : हिंमत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कुठल्याही निवडणुका लावून दाखवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे. ठाकरे यांच्या आवाहनाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना निवडणूक येऊ तर द्या...आम्ही पण तयार आहोत असे म्हणत निवडणूक आयोग आहे की नाही देशात काही. निवडणूका घेऊन दाखवा म्हणजे काय? असा मिश्किल टोला देखील लगावला.

कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली मधील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कोर्ट व वातानुकूलित अभ्यासिकेचे लोकार्पण रविवारी खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

Shrikant Shinde
BJP Mission 150: मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 'मिशन 150'; असा आहे मेगाप्लॅन

निवडणुका लागणारचं आहेत. निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय? देशात, महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी अभ्यास केला असेल तर कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. असे सगळे असताना इलेक्शन घ्या, इलेक्शन घ्या असे बोलल जातेय. आम्ही पण तयार आहोत इलेक्शनला. इलेक्शन येऊन द्या तरी असे मिश्किल हसत उत्तर दिले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. 14 फेब्रुवारी ला भाजपाच्या होणाऱ्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा ठोकणार का? या चर्चाना उधाण आले आहे. यावर डॉ. शिंदे म्हणाले, याआधी देखील ठाकूर कल्याण मतदार संघात आले होते. मी स्वतः त्यांचे स्वागत केलं होतं. आता ते पुन्हा 14 तारखेला येथे येणार आहेत. त्यांचं स्वागत मी मतदारसंघाचा खासदार म्हणून करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते.

Shrikant Shinde
BJP Leader's Secret Explosion: फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा गौप्यस्फोट : ‘महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या उंबरठ्यावर’

त्या दृष्टिकोनातून ते काम करत असतात, पावलं उचलत असतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टी करणे गरजेचे नाही. भाजपा (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात चांगले अंडरस्टँडिंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) दोघेही राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत.

त्यामुळे विकास कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये तीन वेळा देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये येवून गेले. मोठे मोठे विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. येणाऱ्या काळात डबल इंजिनचे सरकार चांगल्या प्रकारे अजून मजबुतीने काम करत राहील, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com