राऊतांकडून माझे २५ लाख परत मिळवून द्या ; कंबोजांची संजय पांडेंना विनंती, पुरावा सादर

राऊतांना दिलेल्या २५ लाखांच्या धनादेशाचा फोटो कंबोज यांनी टि्वट केला आहे. (Mohit Kamboj latest news)
Mohit Kamboj Latest News, Sanjay Raut latest News
Mohit Kamboj Latest News, Sanjay Raut latest Newssarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप करीत भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात रंगलेल्या वादात मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांनी उडी घेतली आहे. टि्वट करीत कंबोज यांनी राऊतांवर टीका केली आहे. (Mohit Kamboj latest news)

दोन दिवसापूर्वी राऊतांनी 'किरीट का कमाल' ('Kirit ka Kamal') असं टि्वट करीत सोमय्यांवर हल्लाबोल केला होता.त्याला कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'किरीट का कमाल' असे म्हणणारे संजय राऊत माझे २५ लाख कधी परत देणार? संजय राऊत यांनी २०१४ मध्ये राऊतांनी त्यांच्या Royal Marathe Entertainmentच्या माध्यमातून माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले आहे. व्याजासह ते २५ लाख परत करणार असल्याची राऊतांनी मला सांगितलं होते. राऊत, माझे पैसे परत करा," असं टि्वट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

'राऊतांकडून पैसे परत मिळण्यासाठी मला मदत करा,'अशी विनंती कंबोज यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे. राऊतांना दिलेल्या २५ लाखांच्या धनादेशाचा फोटो कंबोज यांनी टि्वट केला आहे.

Mohit Kamboj Latest News, Sanjay Raut latest News
महापालिका निवडणुका जूनमध्ये..; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

"शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला दैनिक 'सामना'च्या कार्यालयात बोलावून मला धमकावले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपयेही उकळले होते, असा खळबळजनक दावा यापूर्वीही मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला होता. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला होता.

Mohit Kamboj Latest News, Sanjay Raut latest News
राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज

मोहित कंबोज यांनी एक व्हीडिओ ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले होते. यामध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, २०१४ साली संजय राऊत यांनी मला 'सामना'च्या कार्यालयात बोलावून धमकावले. त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे संजय राऊत मला व्याजासकट परत करणार होते. पण आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत केलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com