
Mumbai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशभरात भाजपाविरोधकांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “तपास यंत्रणांना राजकीय कारवायांची किंमत मोजावी लागेल” असा इशारा राऊतांनी दिला आहे. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"२०२४ मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आमचेच सरकार येणार आहे. हे या यंत्रणांनी लक्षात ठेवावे. त्यांनी जे कायदेशीर आहे ते करावं. त्यांनी त्यांच्या राजकीय बॉसचे आदेश पाळले तर याद राखा. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही, तर सत्य आहे," असे राऊत म्हणाले.
मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवर राऊत म्हणाले, "आघाडीच्या ‘इंडिया’ बैठकीच्या तयारी वेगाने सुरू आहे. राष्ट्रवादाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आहे. विरोधकांच्या कुठल्याही दबाबामुळे 'इंडिया'तून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही," असे राऊतांनी ठामपणे सांगितले. ही बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, "निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. हे सत्र दिल्लीसह राज्या राज्यात भाजपाचे लोक राबवत आहेत. याचा ‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.
“आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. हे सत्र दिल्लीसह राज्या राज्यात भाजपाचे लोक राबवत आहेत. याचा ‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
'इंडिया'ची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काल आपण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही.” असे राऊतांनी नमूद केले.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.