आमचा राजकीय दौरा नाही ; अयोध्या दौऱ्यावरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा

संजय राऊतांनी आज राज ठाकरे यांच्या अयोध्या दैाऱ्यावरुन टीकास्त्र सोडलं.
आमचा राजकीय दौरा नाही ; अयोध्या दौऱ्यावरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा
sarkarnama

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ''पाच जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे,'' अशी घोषणा यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केली. राज्याचे पयर्टनमंत्री आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, पण त्यांच्या दौऱ्याची तारीख शिवसेनेनं जाहीर केली नाही, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay Raut)यांनी आज राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीकास्त्र सोडलं आहे. ''राममंदीराच्या लढाईत शिवसेनेचे काम करीत होती. आमची ही राजकीय यात्रा नाही, अयोध्या दौऱ्याबाबत लवकरच तारीख जाहीर करु,'' असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

हनुमानजयंतीनिमित्त काल दिल्लीत निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक झाली, यावर संजय राऊत म्हणाले, ''गेल्या अनेक वर्षापासून रामनवमी, हनुमानजंयती कार्यक्रमांवर दगडफेक झाली नाही. काल दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात घडविण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत,'' ''राज्यातील शांतता भंग करुन येथे दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे,'' असा आरोप राऊतांनी यावेळी केला.

आमचा राजकीय दौरा नाही ; अयोध्या दौऱ्यावरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा
राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे व्हायचयं!

हिंदुत्वाचा मुद्यावर मनसेचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज ठाकरेंचा हा अयोध्या दौरा असल्याचे बोललं जाते. तर हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दैाऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचे राऊतांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

आमचा राजकीय दौरा नाही ; अयोध्या दौऱ्यावरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा
PMC Elections : कुणाला तिकीट मिळणार ; अजितदादांच्या इच्छुकांना कानपिचक्या

संजय राऊत म्हणाले, ''मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्याला जाण्याची शक्यता आहे. अयोध्या आमचं घर आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com