Sanjay Raut, Raosaheb Danve
Sanjay Raut, Raosaheb Danvesarkarnama

शिवसेना-भाजपमध्ये शिमगा सुरु ; दानवेंच्या दाव्यानंतर राऊतांचा गैाप्यस्फोट, म्हणाले..

काल धुळवड झाली पण त्याचे रंग खरे तर आज उधळले जात आहेत.

मुंबई : भाजपचे नेते महाविकास आघाडीचे २५ आमदार फुटणार असा दावा करीत आहेत, तर शिवसेनेने भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावरून दोन्ही पक्षात शिमग्याला सुरवात झाली आहे. काल धुळवड झाली पण त्याचे रंग खरे तर आज उधळले जात आहेत.

''महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)पंचवीस नाराज आमदार भाजपमध्ये येतील,'' असा गैाप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शुक्रवारी केला आहे. ''निवडणुका येऊ द्या, एक एक आमदार भाजपमध्ये येतील, असा दावा दानवेंनी केला. त्याला शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. ''दानवेंची कालची नशा उतरली असेल काल ते काय बोलले हे त्यांना आज आठवणारही नाही,'' असा टोमणा त्यांनी हाणला.

''काल धुळवळ होती , काही लोक धुळवळीला नशा करतात, भांग पितात, तशी परंपरा आहे, माझ्याकडे अशी माहिती नाही की रावसाहेब दानवे भांग पितात, ते भांग पीत नाही, ते माझे चांगले मित्र आहेत, दिल्लीत ते माझ्या बाजूलाच राहतात, ते कोणत्या नशेत काल बोलले ते मला माहित नाही. ते २५ आमदार बोलले आहे. त्यांना १२५ म्हणायचे असेल. ते चुकून बोलले असतील, आम्ही म्हणतो घ्या ते आमदार, तु्म्ही कुणाची वाट पाहत आहे. त्याचे पन्नास आमदार आमच्या संपर्कात आहेत,'' असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवेंचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सत्तार म्हणाले, ''काल धुळवड होती, रावसाहेब दानवेंनी कशाचे भजे खाल्ले माहित नाही, त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. उलट राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, ते पडत नाही हे लक्षात आल्यावर भाजपचेच २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, तेच कधीही आमच्याकडे येऊ शकतात,''

Sanjay Raut, Raosaheb Danve
शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' स्वीकारलयं ; फडणवीसांनी डिवचलं

"महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील", असं विधान रावसाहेब दानवे यांनी काल केलं. दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी 25 आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. "जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com