राऊतांना लवंडे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना एका वाक्यात प्रत्युत्तर!

प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Raj Thackeray News, Sanjay Raut News, Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut reply to Raj Thackeray
Raj Thackeray News, Sanjay Raut News, Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut reply to Raj Thackeraysarkarnam

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी काल (12 एप्रिल) ठाण्यात उत्तरसभा घेतली, या सभेत तुफान फटकेबाजी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नधान्यपुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदींवर राज ठाकरेंनी टीका केली. कालच्या भाषणात राज ठाकरेंच्या रडारवर महाविकास आघडी सरकारच होतं. (Sanjay Raut News Updates)

गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढणाऱ्या राज ठाकरेंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)टीका केली होती. 'शिवाजी पार्कात भाजपचे भोंगे वाजत होते,' असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी काल पुन्हा डिवचलं. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Raj Thackeray News, Sanjay Raut News, Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut reply to Raj Thackeray
'माझा चेहरा नागासारखा दिसतो; तर तुमचा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो?'

संजय राऊतांनी एका ओळीचं टि्वट करीत राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. ''दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र,'' असे म्हणत राऊतांनी एका अर्थानं 'मनसे हा संपत चाललेला पक्ष आहे,' असे पुन्हा सांगितलं.

नुकतीच ईडीने संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर राऊतांनी पत्रकार परिषदेत घेतली. यात त्यांचा रौद्रावतार पहायला मिळला. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना संजय राऊतांनी शिव्यांचा वापर केला. यावर काल राज ठाकरेंनी भाष्य केलं. ''नुसत्या प्रॉपर्टी जप्त केल्या तर हे लागले शिव्या द्यायला. संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? आमच्या आजोबांनी म्हणजेच प्रबोधनकारांनी अशा लोकांसाठी एक चांगला शब्द शोधला आहे. तो म्हणजे लवंडे..नीट शब्द पाहा अनुस्वार व वर आहे'', असं म्हणत राज यांनी राऊतांना डिवचल

Raj Thackeray News, Sanjay Raut News, Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut reply to Raj Thackeray
मंत्रीपद मिळालयं तर नीट काम करा ; यशोमती ठाकूर यांना पेडणेकरांचा सल्ला

राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभेत बोलत असताना आपल्यावरील आरोपांची सडेतोड प्रत्युत्तर दिलं. '3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. यानंतर माझ्यासह आम्ही सगळे अंगावर केसेस घेण्यासाठी तयार आहोत' असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

ठाकरे म्हणाले, ''जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in