Sanjay Raut : दादा येणार..दादा बोलणार अन् दादा जिंकणार; संजय राऊतांनी केली अजितदादांची स्तुती

Maharashtra Political News : "पंतप्रधान फक्त मन की बात करतात. पण काम की बात करत नाहीत..."
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Mumbai : मुंबईतील बीकेसीत मैदानात आज (१ मे) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी अजित पवार यांची संजय राऊत यांनी जाहीर भाषणात स्तुती केली.

"अजितदादांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार", अशी स्तुती खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "आज सकाळीच भाजपचे एक नेते सांगत होते की महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सर्वात लहान मैदानावर होतेय. मात्र, त्यांना मी सांगतो की, तुमचे डोळे चीनी आहेत चीनी. तुमचे डोळे बारीक आहेत. येऊन पाहा ही काय ताकद आहे. या सभेने एक निकाल दिलेला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. काल इकडे देशाचे गृहमंत्री अमित शाह आले होते. इकडेही सभा पाहायला आले असतील", असं म्हणत त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला.

Sanjay Raut
Ahmednagar News: नगरमध्ये महाआघाडीचा डंका : 14 पैकी 7 बाजार समीतीवर वर्चस्व; भाजपच्या हाती फक्त तीन बाजार समित्या

"या आमची सभा पाहा. आमची ताकद पाहा. हम सब एक है. येथे अजित दादाही बसलेले आहेत. अजितदादा सर्वांनाच तुमचं आकर्षण आहे. सकाळपासून एकच सुरू होतं की दादा येणार ना? दादा येणार ना? आम्ही म्हणत होतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार", असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांची स्तुती केली.

Sanjay Raut
Mahavikas Sabha : पंचवीस वर्षे सोयरीक असलेल्या भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : भाई जगतापांचा हल्लाबोल

"काल देशात एक ईव्हेट झाला. मन की बात. काय असतं मन की बात. या देशाचे एकमेव पंतप्रधान मी पाहिले आहेत की ते गेल्या 9 वर्षात फक्त मन की बात करतात. पण काम की बात करत नाहीत.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम दिल्लीश्वेर करत आहेत. म्हणून त्यांनी शिवसेना तोडण्याचं काम केलं. पण आम्ही त्यांचा हा डाव कधीही साध्य होऊ देणार नाहीत. ही वज्रमूठ नसून महाराष्ट्राची एकी आहे. 2024 ला महाराष्ट्रात आणि देशात ही वज्रमूठ सत्तेत येणार", असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com