sanjay raut : बंडखोरांच्या परतीचे दोर राऊतांनी कापले ; चर्चांना पूर्णविराम

'सिढिया चढते हुए उतरना भूल जाते है..वे घर नहीं लौट पाते..
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

पुणे : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर बंडखोर आमदार आहेत. दोन दिवसापासून टि्वट करीत संजय राऊतांनी (sanjay raut) राज्यपाल, भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे. (sanjay raut latest news)

आज (सोमवारी) सकाळी राऊतांनी प्रसिद्ध हिंदी कवी नरेंद्र सक्सेना यांच्या कवितांचा आधार घेत टि्वट केलं आहे. 'सिढिया चढते हुए उतरना भूल जाते है..वे घर नहीं लौट पाते,'असे टि्वट राऊतांनी केलं आहे.

शनिवारी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटणार असून दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. यावर संजय राऊतांनी टि्वट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे का अशी चर्चा सुरु आहे.

"सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी," अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी शनिवारी) केली होती. त्यानंतर काल (रविवारी) त्यांनी पुन्हा एक टि्वट करुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी राजभवनातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (eknath shinde, devendra fadnavis) यांच्या फोटोसह टि्वट केलं आहे.'उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.' असं टि्वट संजय राऊतांनी केले आहे.

Sanjay Raut Latest Marathi News
Presidential Election : आघाडीची मतं फुटतील ; भाजपकडून संकेत

सत्तास्थापनेचं पत्र राज्यपालांना देतानाचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला आहे.'या फोटोतील त्यांच्या हास्य मुद्रेवर जाऊ नका दिवा तर कबरीवर देखील तेवत असतो' असं त्याच्या कॅप्शन मध्ये राऊतांनी म्हटलं आहे. यामध्ये 'वेट अ‍ॅन्ड वॉच' असं लिहलं आहे. त्यामुळे आता राऊत येत्या काही दिवसात कोणता नवीन गौप्यस्फोट करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com