Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

CM Eknath Shinde Davos Tour news : राज्यातील आपले सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला जात नाही, असा आरोप संजय राऊतांनी केला होता.
Sanjay Raut , Eknath Shinde
Sanjay Raut , Eknath ShindeSarkarnama

Sanjay Raut News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दावोस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (CM Eknath Shinde Davos Tour news)

मुख्यमंत्री शिंदे या दौऱ्याला ते जाणार का नाही, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील आपले सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला जात नाही, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आज (सोमवारी) दावोस जाण्यापूर्वी शिंदेंनी टि्वट करीत आपल्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

Sanjay Raut , Eknath Shinde
WEF News : दावोस परिषदेत मुख्यमंत्री २० उद्योगांसोबत इतक्या कोटींचा सामंजस्य करार करणार...

"दावोसमधून काय येतय ते माहित नाही. पण तुमच्या नाकाखालून अनेक उद्योग गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा .राज्यातील गेलेले प्रकल्प परत आणा. तुमच्या नाकाखालून गेलेले प्रकल्प परत आणा," अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.

संजय राऊत म्हणाले, "वेदांत, फॉक्सकॉन, एअर बस, ड्रग्स पार्क हे प्रकल्प तुमच्या नाकासमोरून ते घेऊन गेले. ते परत आणा, दावोसमध्ये काय होतं हे आम्हाला माहित आहे,"

"मुंबईतले बहुतेक सर्व प्रकल्प महाविकास आघाडीमुळे आले आहेत. आता पुन्हा त्याच प्रकल्पांचे उद्धाटन शिंदे-फडणवीस यांचे सरकार करत आहेत. त्यासाठी प्रधानमंत्र्यांना बोलावले आहे," असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut , Eknath Shinde
Chhatrapati Sambhaji Maharaj News : संभाजी महाराज धर्मवीर की धर्मरक्षक ? ; नेत्यांमध्ये रंगलयं टि्वटर वॅार

"सरकारने सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या आहे, अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले आहेत. न्यायव्यवस्थेवर घाला घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेने डाग लावण्याचे काम सुरु आहे.पंतप्रधान पदाची एक प्रतिष्ठा असते. तुम्ही त्यांना आधीच झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी बोलावू शकत नाही. भाजपला त्यांच्या पदाची प्रतिष्ठा नसेल तर हे करा.

राज्यातील नियोजित उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकार होत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस परिषदेत उद्योगाबाबतची आपली भूमिका मांडली आहे, "या परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com