Sanjay Raut : अमृता वहिनी गप्प का ? ; तेव्हाच बाबा रामदेवांच्या कानाखाली का दिली नाही..राऊत संतापले

Sanjay Raut : बाबा रामदेव यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
 Baba Ramdev  controversial remark
Baba Ramdev controversial remarksarkarnama

Sanjay Raut : योगगुरू रामदेवबाबा यांच्या कथित वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ठाण्यात झालेल्या योग शिबिरात त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. (mp Sanjay Raut latest news)

ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. राऊत शनिवारी माध्यमांशी बोलत होते. "बाबा रामदेव महिलांबाबत असे विधान करीत असताना अमृता वहिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली सणकन ओढली पाहिजे होती. त्या गप्प का ? " असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

 Baba Ramdev  controversial remark
Eknath Shinde : कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे टेक ऑफ ; सहा आमदारांची दांडी

"महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात," असे विधान बाबा रामदेव यांनी काल (शुक्रवारी) केलं आहे. या विधानानंतर बाबा रामदेव यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली-पाटील ठोंबरे यांनी काल संताप व्यक्त केला आहे.

 Baba Ramdev  controversial remark
Rupali Chakankar : महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांना महिला आयोगाचा दणका

बाबा रामदेव यांच्यावर या प्रकरणी महिला आयोगाने रामदेव बाबांना नोटिस पाठवली आहे, तीन दिवसात याबाबत खुलासा करावा, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या नोटिसमध्ये म्हटलं आहे.

आपण केलेल्या विधानामुळे महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला गेला आहे, समाजमाध्यमांवर आपल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आपल्या विरोधात याबाबत तक्रारी आल्या आहेत, याबाबत आपण तीन दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असे महिला आयोगाने बाबा रामदेव यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या या विधानाची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.

ठाण्यातील हायलँड मैदानात रामदेव बाबा यांनी शुक्रवारी योगाचे धडे दिले. यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद, आमदार रवी राणा यांनीही मंचावर हजेरी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com