Sanjay Raut : राऊतांचा पाय आणखी खोलात.. ; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार ?, नाशिकनंतर ठाण्यात..

Sanjay Raut : राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी राऊतांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाण्यातही राऊतांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यात शिवसेना महिला आघाडी संजय राऊतांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. त्यांच्या विरोधात काल (रविवारी) संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात राऊतांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Sanjay Raut
Shiv Sena : 'शिवसेनाभवन' ठाकरेंचे कि शिवाई ट्रस्टचे ? ; मनसेकडून कागदपत्र व्हायरल , वाचा सविस्तर..

निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.

अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याचे बेलदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिंदेच्या शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात नवीन घटना घडत आहेत. राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष विकोला जात आहे. काल (रविवारी) दादरमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in