'सामना'तील लेखाच्या आधारे राऊतांची चंद्रकांतदादांना मानहानीची नोटीस

'सामना'मधील एका अग्रलेखाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना डिवचले होते.
'सामना'तील लेखाच्या आधारे राऊतांची चंद्रकांतदादांना मानहानीची नोटीस
Chandrakant Patil, Sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवेसनेचे मुखपत्र असेलल्या 'सामना'मधील एका अग्रलेखाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या पत्नीवरील पीएमसी घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन डिवचले होते अग्रलेखावर प्रतिक्रिया असलेला पाटील यांचा लेख सामनामध्ये प्रसिध्द करण्यात आला होता. या लेखातील आरोपांमुळंच आता पाटील अडचणीत आले आहेत. राऊत यांनी पाटील यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.

संजय राऊत यांनी वकिलाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. 'मी व माझ्या पत्नीविषयी मानहानीकारक, आधार नसलेल्या वक्तव्याबद्ल चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चंद्रकांतदादांनी विनाशर्त माफी न मागितल्यास मी त्यांच्याविरोधात न्यायालायत जाईन,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.


Chandrakant Patil, Sanjay Raut
सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर महापालिकेत स्वबळावर! पवारांचा इशारा

चंद्रकांतदादांनी काय आरोप केला होता?

'सामना'च्या अग्रलेखाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या पत्नीवरील पीएमसी घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन डिवचले होते. 'मला ईडीचा अनुभव नाही. पण ईडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केल्यावर ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता,' असे पाटील म्हणाले होते.

'अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केलात. हे सर्व पाहिल्यावरून मला वाटले की, पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं खोचक टोला पाटलांनी राऊतांना लगावला होता. यावरून पाटील आणि राऊत यांच्यामध्ये मागील महिन्यात शाब्दिक चकमक उडाली होती.

...सव्वा रुपयाचा दावा ठोकणार!

'भाजपची (BJP) दळभद्री आरोप करण्याची संस्कृती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जे काही आरोप केलेत ते मला मान्य नाही. यासाठी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा नाही तर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार,' असा इशारा राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार राऊतांनी शुक्रवारी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Related Stories

No stories found.