मुंडे, महाजनांना राजकारणातून संपविण्यासाठी कोणीतरी पडद्यामागून प्रयत्न करतयं !

गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांच्या कुंटुबातील बातमी वाचल्यानंतर आम्ही व्यथित होतो.
Pankaja Munde News, Sanjay Raut News
Pankaja Munde News, Sanjay Raut Newssarkarnama

मुंबई :विधान परिषदेच्या उमेदवारीपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आले आहे, त्यांच्याऐवजी उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं पंकजा मुंडेंना डच्चू दिल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. (Pankaja Munde News)

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde News, Sanjay Raut News
MNS : राज ठाकरे हाजीर हो ! ; शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट

संजय राऊत म्हणाले "पंकजा मुंडे या आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या, ओबीसीच्या नेत्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या प्रकारचे पडसाद उमटले ते पाहिल्यावर आणि वाचल्यावर मला असे वाटले की, कोणीतरी पडद्यामागून मुंडे,महाजन यांचे नाव राज्यातून तसेच देशाच्या राजकारणातून संपावे यासाठी प्रयत्न करत आहे,"

त्यांच्या कुंटुबातील बातमी वाचल्यानंतर आम्ही व्यथित..

"कोणाला उमेदवारी देण्याची हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मुंडे आणि महाजन यांचा शिवसेना-भाजप 25 वर्षांच्या युतीच्या काळामध्ये आमचा आणि त्यांचा निकटचा संबंध होता. या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेले. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांच्या कुंटुबातील बातमी वाचल्यानंतर आम्ही व्यथित होतो,"

उद्धव ठाकरेंची सभा ऐतिहासिक

"महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधकासाठी विरोध सुरू आहे. हे आंदोलन जे विरोधकांनी अवलंबवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचाच भविष्यात सत्यानाश होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल झालेली सभा ही ऐतिहासिक होती. जे टीका करत आहेत, त्यांच्या डोळ्यातील बुबळं बाहेर आली असतील. कालची सभा अती विराट सभा होती, त्यामुळे त्यांच्या टीकेला लक्ष देण्याची गरज नाही," असे राऊत म्हणाले.

याला भाजप जबाबदार

"भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाला धमक्या दिल्या जात आहे, त्याला भाजप जबाबदार आहे. भाजपमुळे देशात दहशतवाद वाढत आहे. देशात सर्व व्यवस्थित सुरू असताना भाजपचे प्रवक्ता देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, याला भाजप जबाबदार आहे," असा आरोप राऊतांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com