काश्मीर रक्तबंबाळ झालेले असताना सत्तेची ८ वर्षे कसली साजरी करता ? ; राऊतांचा हल्लाबोल
narendra modi, sanjay raut sarkarnama

काश्मीर रक्तबंबाळ झालेले असताना सत्तेची ८ वर्षे कसली साजरी करता ? ; राऊतांचा हल्लाबोल

काश्मिरी पंडितांना त्रास देऊन पळवले जात आहे, त्यांची हत्या करण्यात येत आहे.

मुंबई : काश्मिरमध्ये पंडितांची (kashmit pandit), हिंदू समाजातील लोकांची याबरोबरच मुस्लिम समाजातील सुरक्षा रक्षकांची देखील हत्या केली जात आहे. या घटनेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप करीत हल्लाबोल केला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (kashmit pandit latest news)

"काश्मीर रक्तबंबाळ झाले आहे आणि भाजप सत्तेची आठ वर्षे कसली साजरी करत आहे? काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकारच्या कानात जात नाही का? काश्मिरमध्ये 1990 ला जेव्हा हत्याकांड झाले तेव्हा आणि आता देखील भाजप सत्तेत असताना काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे," असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली.

"काश्मीर पुन्हा एकदा जळत आहे, रक्तबंबाळ होत आहे, काश्मिरची स्थिती नियंत्रणाहून बाहेर गेली आहे आणि आमचे दिल्लीचे प्रमुख लोकं त्यांच्या राजकीय प्रमोशनमध्ये गुंतले आहे, कधी 'काश्मिर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करतात तर कधी 'पृथ्वीराज'चे प्रमोशन होत आहे. काश्मिरी पंडितांचे आक्रोश ऐकायला मात्र कोणीही तयार नाही," अशी खंत राऊतांनी व्यक्त केली.

narendra modi, sanjay raut
Sanjay Raut : "नेहरूंना ED ची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल"

राऊत म्हणाले, "काश्मिरमध्ये पंडितांची, हिंदू समाजातील लोकांची याबरोबरच मुस्लिम समाजातील सुरक्षा रक्षकांची देखील हत्या केली जात आहे. आतापर्यंत 20 मुस्लिम सुरक्षा रक्षकांची हत्या झाली आहे. काश्मिरी पंडितांना देखील त्रास देऊन त्यांना पळवले जात आहे त्यांची हत्या करण्यात येत आहे. हजारो पंडित काश्मीर खोरे सोडून इतर ठिकाणी जात आहे, मात्र सरकार काय करत आहे,"

राज्य सरकार मदत करणार

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांच्या पलायन आणि हत्येवर चिंता व्यक्त केली, महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने काश्मिरी पंडितांच्या पाठीमागे आहे, त्यांच्यासाठी व त्यांच्या कुंटुंबियांना हवी ती मदत राज्य सरकार करणार आहे, त्यासंबधी आम्ही एक योजना देखील आखत आहे," असे राऊत म्हणाले.

राजकीय दौरा नव्हे

आम्ही 15 ते 20 जण अयोध्येला जात आहोत. उद्या देखील आम्ही अयोध्येतच असणार आहोत. त्याठिकाणी लोकांच्या भेटीगाठी घेणार असून, 15 जूनला आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आम्ही अयोध्येत जात आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख जण आज अयोध्येला जात आहेत. हा दौरा राजकीय नसल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत म्हणाले..

  1. काश्मीर हिंदुंच्या रक्तांनी भिजून चालला आहे. रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो पंडित आपल्या मुलांबाळांसोबत पलायन करत आहेत. काश्मिरमध्ये लोकांचे आक्रोश चालले आहे आणि इकडे सरकार पृथ्वीराज चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

  2. एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. ताजमहाल खालचे शिवलिंग शोधण्यात येत आहे, ज्ञानवापीत देखील तुम्ही तेच करतायेत, भाजप वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काश्मिरी पंडितांचे आक्रोश ऐकायला भाजपकडे वेळ नाही.

  3. 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील. हे काही आमचे राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, पण महाराष्ट्रातील काही प्रमुख लोकं त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील.

  4. योगींना आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. योगी हे प्रमुख नेते आहेत. हिंदुत्वावादी विचारांचे एक प्रखर असे राष्ट्रीय नेते आहेत. योगींकडून देशाला खूप अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in