बंडखोरांमुळे राऊतांना झाली राणेंची आठवण ; राणेंच्या हिमतीचं केलं कौतुक, म्हणाले..

तुमच्यात धमक आहे ना, मग आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरं जा.
sanjay raut, narayan rane
sanjay raut, narayan ranesarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय संकट वाढत आहे. शिवसेनेत (Shiv Sena) सुरू असलेल्या बंडखोरी दरम्यान भाजप नेतेही सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने 'शिवसेना बाळासाहेब' या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गुवाहाटीतील बंडखोर आमदारांवर सातत्याने निशाणा साधत आहे. (rebel shiv sena mlas eknath shinde news)

शिवसेनेतील बंडखोरीच्या आज सहाव्या दिवशी राऊतांनी शिवसेनेत यापूर्वी झालेली बंडखोरीवर भाष्य केलं. सध्या भाजपमध्ये असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची आठवण राऊतांना झाली. ते माध्यमांशी बोलत होते.

"मी नारायण राणे यांना मानतो. त्यांचा गट लहान होता, पण त्यांनी राजीनामे दिले. निवडणुकीला सामोरे गेले. तसं तुमच्यात धमक आहे ना, मग आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरं जा. मध्य प्रदेशातही फुटलेल्या लोकांनी राजीनामे दिले. जिंकून आले आणि सरकार बनवलं. हिंमत असेल, तर राजीनामे द्या," असे राऊत म्हणाले.

sanjay raut, narayan rane
बंडखोरांमध्ये मतभेद : दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागणार ? ; २० ते २५ आमदारांमध्ये नाराजी

बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते..

काही आमदारांनी बोलणं झालं आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचंही राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी शाहजी बापू पाटील यांच्या गाजत असलेल्या संवादावरूनही टोला लगावला. "अस्वस्थता हा शब्द खूप सौम्य आहे. बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते. अडीच वर्षांपासून सत्तेत आहेत. मलईदार खाती घेऊन बसलेत आणि आता त्यांना साक्षात्कार झालाय का? त्यांच्या जेवणात चरस, गांजा, अफू देताहेत का मला माहिती नाही," असं राऊत म्हणाले.

मुंबईत तर यावंच लागेल ना.

"उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू नका. तुमच्या बापाचं नाव वापरा आणि मतं मागा. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून आम्ही त्यांचे भक्त आहोत, सांगतील. पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत सुरू खुपसत नाही. जे व्हायचं, ते होऊ द्या. मुंबईत तर यावंच लागेल ना. शिवसैनिक रस्त्यावर आहेत, फक्त आमच्या इशाऱ्याची वाट बघताहेत." असा इशारा राऊतांनी यावेळी दिला.

तुम्ही दहावेळा बाप बदलत आहात

राऊत म्हणाले, "आमच्या पक्षाचा एकच बाप आहे. तुमचे तर शंभर बाप आहेत. कुणी मुंबईत आहे. कुणी दिल्लीत आहे. कुणी नागपूरमध्ये आहे. तुम्ही दहावेळा बाप बदलत आहात. कधी वडोदऱ्याला जाता. कधी सुरतला जाता. कधी गुवाहाटीला जाता. कधी दिल्लीला जाता. बाप बदलणं आमच्या पक्षात चालत नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com