भाजपने युती तोडली तेव्हा हे कुठे होते ? राऊतांचा बारा खासदारांवर घणाघात

आमची शेवटपर्यंत युती होती. पण भाजपने युती तोडली. युतीचा वचननामा तेव्हाही होता. पण तेव्हा युती का तोडली? २०१९ साली सुद्धा भाजपमुळेच युती तुटली. शिवसेना जबाबदार नाही.
MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे काल (मंगळवारी) दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) १२ आमदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आपल्या गटाचे गटनेता आपल्या गटाचे गटनेता आणि मुख्य प्रतोद यांना मान्यता द्यावी, याबाबतची विनंती त्यांनी केली.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट करीत शिवसेनेवर घणाघात केला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्यु्त्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, "आता जे आमचे 12 प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसोबत बोलत होते ते 2014 साली कुठे होते? भाजपने युती तोडली तेव्हा ते कुठे होते? आम्हाला युती तेव्हा हवी होती. आमची शेवटपर्यंत युती होती. पण भाजपने युती तोडली. युतीचा वचननामा तेव्हाही होता. पण तेव्हा युती का तोडली? २०१९ साली सुद्धा भाजपमुळेच युती तुटली. शिवसेना जबाबदार नाही,"

MP Sanjay raut
100 कोटी द्या,मंत्री बनवतो : आमदारांना फसविणाऱ्या चौघांना अटक

संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि ठाकरे कुटुंबात जे संबंध आहेत ते राजकीय नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संबंध आहेत. त्यांनी मोदींना ताकद आणि पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांमध्ये सतत बोलणं असायचं. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील एक नातं कायम राहिले. जे कुणी गौप्यस्फोट करत आहेत, त्यांना मोदींनी सांगितलं असेल. त्या गोष्टीकडे फारसं लक्ष देवू नका,"

"आम्ही यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याबाबतच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेलो. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं काय? आम्ही निर्णय घेणार होतोच की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार होतो. हे लोकं आले की आणि त्यांनी तशीच मागणी केली. तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षात राहणार का ? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा सर्व हो म्हणाले होते. तुम्ही भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असं सांगणारे हे लोकं आहेत. तुम्ही यांच्यावर काय विश्वास ठेवतात? ", असा सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

मॅटिनी शोच काय तर पूर्ण सिनेमाच आमचा

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राऊतांवर घणाघात केला. संजय राऊत यांचा सकाळचा मॅटिनी शो आता बंद झाला आहे, ते दखल घेण्यासारखे नाहीत, अशी टीका शिंदेंनी केली. त्यांच्या या टीकेवर संजय राऊतांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. मॅटिनी शो आमचाच आहे. तसेच मॅटिनी शोच काय तर पूर्ण सिनेमाच आमचा आहे, असे राऊतांनी सुनावले. "भाजपला धडा शिकवण्याची संधी आहे. ज्यांनी आपला अपमान केला, ज्यांनी ठाकरेंचा शब्द पाळला नाही," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com