राहुल शेवाळे ठाकरेंना आव्हान देत मुंबईत एंट्री करणार ! सोबत रेल्वेमंत्र्यांचे पत्रही

Rahul Shewale latest news |खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले आहे.
राहुल शेवाळे ठाकरेंना आव्हान देत मुंबईत एंट्री करणार ! सोबत रेल्वेमंत्र्यांचे पत्रही

नवी दिल्ली : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी आता गती मिळणार आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. शेवाळे सध्या दिल्लीत आहेत. उद्या (शनिवारी) शेवाळे हे मुंबईत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. (Rahul Shewale latest news)

राहुल शेवाळे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेऊन यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे होते.

रेल्वेची सुमारे 45 एकर जागा हस्तांतरित न झाल्याने धारावीचा पुनर्विकासाला रखडलेला आहे, आता त्याला गती मिळणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले आहे.त्यांच्या या पत्राला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेवाळेंना दिली आहे. या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या खासदार शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे.

राहुल शेवाळे ठाकरेंना आव्हान देत मुंबईत एंट्री करणार ! सोबत रेल्वेमंत्र्यांचे पत्रही
OBC Reservation PCMC : पिंपरीत ३७ ओबीसी नगरसेवक दिसणार ; काही दिग्गजांचा पत्ता कट

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी रेल्वेची सुमारे 45 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार होती. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रेल्वेला सुमारे 800 कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही हस्तांतरण प्रक्रिया रखडल्याने धारावी पुर्विकास प्रकल्पाला ब्रेक लागला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार

राहुल शेवाळे हे उद्या (शनिवार) दुपारी एक वाजता मुंबई विमानतळावर येणार आहेत. दुपारी २ वाजता ते प्रभादेवी येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. दुपारी पावणेतीन वाजता ते दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहेत, तर दुपारी सव्वातीन वाजता सावकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत.

दरम्यान लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला दिलेली मंजुरी रद्द करावी आणि १२ खासदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी काल (गुरुवारी) लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन केली.

लोकसभाध्यक्षांची भेट घेण्यापूर्वी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करून राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान दिले. लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची तर, मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी करणारे पत्र १९ जुलै रोजी शिंदे गटातील १२ खासदारांनी बिर्ला यांची भेट घेऊन सादर केले होते. या पत्राची तातडीने दखल घेत बिर्ला यांनी त्याच दिवशी गटनेते बदलाला मंजुरी दिली होती. मात्र, ही मंजुरी आणि लोकसभाध्यक्षांची कृती एकतर्फी आणि बेकायदा असल्याचा दावा शिवसेनेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला आहे.

८ ऑगस्टला सुनावणी

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून ‘धनुष्यबाण’ या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com