नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक? रुग्णालयातून बाहेर येताच मोठी घोषणा

कोणत्या पक्षाचा प्रचार करणार, यावर राणा यांनी थेट भाष्य केलेलं नाही.
नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक? रुग्णालयातून बाहेर येताच मोठी घोषणा
MP Navneet Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर पडताच मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पण कोणत्या पक्षाचा प्रचार करणार, यावर त्यांनी थेट भाष्य केलेलं नाही. पण त्यांच्या स्वागतासाठी रुग्णालयाबाहेर भाजपचेही कार्यकर्ते जमल्याची चर्चा होती. तसेच भाजप नेत्यांकडून सतत राणांची पाठराखण केली जात आहे. त्यावरून त्या थेट भाजपच्या बाजूने मैदानात उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. (MP Navneet Rana Latest marathi News Update)

मागील 25 वर्षांपासून मुंबई महापालिका शिवसेनेच्या (Shiv Sena) ताब्यात राहिली आहे. राज्याच्या इतर महापालिका, जिल्हा परिषदा किंवा विधानसभेचा निकाल काहीही लागो पण मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. भाजपसोबत (BJP) युती करत शिवसेनेने आपला दबदबा कायम ठेवला आहे. पण आगामी निवडणुकीत ही युती नसेल. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. आता त्यात नवनीत राणा यांनीही उडी घेतली आहे. (MP Navneet Rana will campaign in BMC Election)

MP Navneet Rana Latest Marathi News
दम असेल तर निवडणूक लढवा, मी हरवून दाखवेन! नवनीत राणांचं मुख्यमंत्री ठाकरेंना चॅलेंज

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर राणा यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने बाहेर पडणार आहे. चौदा दिवसांत माझी हिंमत तुटेल, असं त्यांना वाटलं. पण ते शक्य नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण कोणत्या पक्षासाठी प्रचार करणार यावर त्यांनी थेट देण्याचं टाळलं. भ्रष्टाचारी लंकेला संपवण्यासाठी जिथे गरज पडेल, तिथे मी उतरणार आहे. असं उत्तर देत राणा यांनी शिवसेनेच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट केलं.

भाजपला देणार साथ?

राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बहुतेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. माजी खासदार किरीट सोमय्या तर पोलीस ठाण्यातही दोघांना भेटायला गेले होते. तसेच नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सोमय्या तिथं पोहचले. राणा दाम्पत्याकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत टीका केली जाते. तर फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जातं. त्यामुळे नवनीत राणा यांनी थेट भाजपचं नाव घेतलं नसलं तरी वेळ आल्यानंतर त्या भाजपच्याच व्यासपीठावर दिसतील, अशीच चर्चा आहे.

महापालिकेतील शिवसेनेची ताकद

मागील 25 वर्षांपासून पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला 1997 च्या निवडणुकीत 103 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर एकदाही 100 चा आकडा पार करता आलेला नाही. 2002 च्या निवडणुकीत 97 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपशी युती होती. त्यानंतर 2007 मध्ये सेनेला 84 आणि 2012 मध्ये 75 जागा मिळाल्या. मागील म्हणजे 2017 च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या. आता शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपनं कंबर कसली असून नवनीत राणा यांनाही प्रचारात उतरवण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.