हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? नवनीत राणांची पंचाईत, व्हिडीओ व्हायरल

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्याला झालेल्या अटकेनंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू झाले.
Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Marathi NewsSarkarnama

मुंबई : देशभरात सध्या हनुमान चालीसेचा मुद्दा गाजत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्याला झालेल्या अटकेनंतर ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू झाले. राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन चालीसा पठण केलं. पण आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. (MP Navneet Rana Latest Marathi News)

तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्ली गाठली आहे. तिथं पत्रकार परिषदा, माध्यमांना मुलाखती देत हे दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. आपण हनुमान बख्त असल्याचे सांगत त्यांच्याकडून हनुमानासाठी 14 दिवसच काय पण 14 वर्षे तुरुंगात जाऊ असं तुरुंगात सुटल्यानंतर म्हटलं होतं. (MP Navneet Rana Viral video)

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
अमित शहांचा महिला IAS अधिकाऱ्यासोबतचा फोटो व्हायरल करणं निर्मात्याला पडलं महागात

मात्र, आता राणा दाम्पत्याच्या एका व्हिडीओची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. एक इंग्रजी वृत्तवाहिनीला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना हनुमानाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसते. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या हनुमान भक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

मुलाखतीदरम्यान सुत्रसंचालिका नवनीत राणा यांना एक प्रश्न विचारतात. तुम्ही हनुमानाचे एवढे भक्त आहात, मग हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं?, हे सांगा. या प्रश्नावर नवनीत राणांना काय उत्तर द्यावे, हे सुचत नसल्याचे व्हिडीओ दिसते. रवी राणा यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनीही मान खाली घातली. दोघांनीही हे माहिती नसल्याचे व्हिडीओ दिसते.

दोघांनाही उत्तर माहिती नसल्याचे पाहून सुत्रसंचालिकेने पुन्हा तोच प्रश्न विचारला. हनुमानाचं नाव आधी हनुमान नव्हते. ते कसं पडलं, असं त्यांनी विचारलं. त्यावर नवनीत राणा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत सांगितलं की, तुम्ही आता इतिहासात नेणार असाल तर आम्ही माहिती घेऊ. इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी नक्की बोलेन, असं उत्तर नवनीत राणा यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com