जामीन मिळताच नवनीत राणांना जे. जे. रुग्णालयात हलवलं!

राणांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या उपचारासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathisarkarnama

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी तुरुंग प्रशासनाने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्या भायखळा कारागृहात होत्या. राणांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या उपचारासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. (Navneet Rana Latest News in Marathi)

नवनीत राणा व रवी राणा (Ravi Rana) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघेही बारा दिवसानी तुरूंगाबाहेर येतील. पण त्याआधीच नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले आहे. नवनीत राणा यांना मणक्याचा त्रास आहे. न्यायालयीन कोठडी मध्ये असताना जमिनीवर बसवण्यात आल्याने आणि झोपावे लागत असल्याने त्रास वाढला आहे. सिटी स्कॅन करायला तुरुंग अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. जर नवनीत राणा यांना काही झालं तर तुम्ही त्याला जबाबदार असाल, असं वकिलांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना मणक्याच्या उपचासाठी बुधवारी दुपारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Navneet Rana Latest News in Marathi
महापालिका निवडणुका कधी? मुश्रीफांनी सांगितला मुहुर्त

दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मागील आठवड्यात अपूर्ण राहिली होती. त्यावर सोमवारी निकाल लागणार होता. पण इतर प्रकरणांवरील सुनावणीमुळे निकाल लागला नाही. त्यातच मंगळवारी रमजान ईदमुळे न्यायालयाला सुटी होती. त्यामुळे बुधवारी (ता. 4) ही सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोघांनीही जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांना काही अटीही घातल्या आहेत. या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

राणा दांपत्याला 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की लोकशाहीमध्ये नागरी हक्कांनाही मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत आव्हान दिले. पोलिसांनी राणा दांपत्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र ते ऐकत नव्हते. वारंवार सोशल मिडियावरून आक्षेपर्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांशी बोलण्याचा पद्धतही राणां दापत्यांची चुकीची होती, असा दावा घरत यांनी होती. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी जोरदार मागणी घरत यांनी न्यायालयात केली होती. पण न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत त्यांना जामीन दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com