प्रकृती अत्यवस्थ असल्याने नवनीत राणा तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात

न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathisarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनीत राणा यांना भायखळा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर घरी न जाता त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना बुधवारी जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. दिलासा दिला आहे. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.

मागील तेरा दिवसांपासून राणा दाम्पत्य तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तुरुंगात असताना त्यांना मानेचा त्रास सुरू झाला होता. जमिनीवर झोपावे लागत असल्याने त्यांना प्रचंड वेदना होत असल्याची तक्रार होती. त्यांच्या वकिलांनी कारागृह प्रशासनाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. भायखळा कारागृहात तपासणीसाठी विलंब झाल्याने त्यांचा त्रास वाढल्याचा दावा राणांच्या वकिलांनी केला आहे. (Navneet Rana Ravi Rana Latest News)

Navneet Rana Latest News in Marathi
भिडे, एकबोटेंना कधी भेटलो नाही! शरद पवारांचं उलटतपासणीत उत्तर

दरम्यान, न्यायालयाने दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद ३० एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

मात्र हा जामीन देताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला ३ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या तीन अटींमध्ये पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरु नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांंशी कोणत्याही प्रकारची छेडछा करु नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देवू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आज संध्याकाळ पर्यंत राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com