नवनीत राणांनी पुन्हा वाचली हनुमान चालिसा अन् म्हणाल्या, उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरू

Navneet Rana | Uddhav Thackeray : आमदार रवी राणा यांनी देखील येत्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,असे भाकित केले होते.
Navneet Rana & Uddhav Thackeray Latest News
Navneet Rana & Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे हे भाजपमध्ये (BJP) जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे यांच्या या बंडाच्या पवित्र्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून शिवसेनेवर टीका केली आहे. यावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई ते दिल्ली विमान प्रवासा दरम्यान हनुमान चालीसा वाचल्याचे सांगत उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरु झाली, असे ट्विट करत राणा य़ांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे.

Navneet Rana & Uddhav Thackeray Latest News
शिंदेंसोबत असलेल्या नऊ आमदारांच्या अपहरणाची कुटुंबीयांकडून तक्रार! मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

काल पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने उभे केलेले पाचही उमेदवार विजयी झाले आहे. या विजयानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे भाजप नेत्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केली जात आहे. यामध्ये ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी म्हणजे 'मातोश्री' समोर हनुमान चालीसा वाचनावरून चर्चेत आलेल्या आणि यावरून तरूगांत जावे लागलेल्या खासदार नवनीत राणा यांनीही राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडीवरून उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरू झाली असल्याची टीका केली आहे.

Navneet Rana & Uddhav Thackeray Latest News
या पाच कारणांमुळे एकनाथ शिंदेंनी केली शिवसेनेशी बंडखोरी

राणा यांनी मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान हनुमान चालीसा वाचतानांचा एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरू," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर आमदार रवी राणा यांनी देखील येत्या दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाकित केले होते.

दरम्यान, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता,' असं ट्विट करत शिवसेनेवर टीका केला. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून भाजपच्या अन्य नेत्यांकडूनही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे बघण औत्सुक्याचै ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com