दम असेल तर निवडणूक लढवा, मी हरवून दाखवेन! नवनीत राणांचं मुख्यमंत्री ठाकरेंना चॅलेंज

मागील तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना घरी सोडण्यात आलं आहे.
MP Navneet Rana, CM Uddhav Thackeray
MP Navneet Rana, CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मागील तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. दम असेल तर महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मी विरोधात लढेन, असं राणा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राणा यांच्या या आव्हानाला शिवसेना कसं उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (MP Navneet Rana Latest marathi News)

राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) बारा दिवस तुरुंगात होते. चार दिवसांपूर्वी दोघांनाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनावर सुटका झाल्यानंतर नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तुरूंगात असताना त्यांच्या मानेचा त्रास बळावला होता. रुग्णालयात त्यांची तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले. (MP Navneet Rana Challenge to CM Uddhav Thackeray)

MP Navneet Rana, CM Uddhav Thackeray
पवारसाहेब, काकडेंना कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका! बापटांची गुगली

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेला शिंगावर घेतलं. त्या म्हणाल्या, मी अशी काय चूक केली, ज्याची शिक्षा मला दिली. हनुमान चालीसा पठण आणि रामाचे नाव घेणे गुन्हा असेल तर चौदा दिवस नाही चौदा वर्ष जेलमध्ये राहण्यास तयार आहे. चौदा दिवसांत ही महिला दबणार नाही. आमची लढाई देवाच्या नावासाठी आहे. मी पुढेही ही लढाई सुरू ठेवणार आहे.

ज्यापध्दतीने माझ्यावर कारवाई करण्यात आली, जनतेने ते पाहिले आहे. क्रुरपध्दतीने महाराष्ट्रातील एका महिलेवर, मुलीवर कारवाई केली आहे. सत्तेचा दुरूपयोग करण्यात आला. आता मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते, दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे. महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ त्यांनी निवडावा. मी त्यांच्या विरोधात उभी राहीन. महिलेच्या ताकदीसमोर आणि प्रामाणिकपणासमोर कोण निवडून येऊ शकते, हे दिसेल. पुर्वजांच्या नावाने मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता जनतेसमोर येऊन लढावे. महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल, असं आव्हान राणा यांनी दिलं.

MP Navneet Rana, CM Uddhav Thackeray
आढळरावांच्या पुनर्वसनासाठी कोल्हेंकडून शुभेच्छा! राऊतांना दिलं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने बाहेर पडणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. चौदा दिवसांत माझी हिंमत तुटेल, असं त्यांना वाटलं. पण ते शक्य नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येणार आहे. भ्रष्टाचारी लंकेला संपवण्यासाठी जिथे गरज पडेल, तिथे मी उतरणार आहे, असं सांगत राणा यांनी नेमक्या कोणत्या पक्षाचा प्रचार करणार याबाबत स्पष्ट केलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com