Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंसोबतच्या बडव्यांमुळे खासदार किर्तीकर नाराज ; कदम म्हणाले..

Ramdas kirtiker : गजाभाऊंनी मनातली खंत व्यक्त केल्याचे रामदास कदम म्हणाले.
Ramdas Kadam
Ramdas Kadamsarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena)नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भेट घेतली होती. रामदास कदम यांच्या मुंबईतील पालखी या निवासस्थानी ही भेट झाली. यादरम्यान दोघांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. किर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु मुलगा अमोल किर्तीकर यांच्या विरोधामुळे त्यांनी शिंदे गटाच्या त्यांना माघार घेतली. परंतु आता रामदास कदम यांनी किर्तीकर यांच्या भेट घेतल्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

कदम म्हणाले, गजाभाऊ जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी मनातली खंत व्यक्त केली. राष्ट्रवादीची शिवसेनेने साथ सोडली पाहिजे, अशी गजाभाऊंची इच्छा होती. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनाप्रमुकांच्या विचारांशी उद्धवजींनी फारकत घेतली. यांच्याभोवती बडवे जमले आहेत. सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्यासाऱखे बडवे ठाकरेंभोवती जमले, असेही गजाभाऊंनी खंत व्यक्त केली. असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

Ramdas Kadam
Bachchu Kadu : अन्यथा सात-आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ ; कडूंचा शिंदे-फडणवीसांना इशारा!

आदित्य ठाकरे याला काही कळत नाही. त्यांना फक्त चाळीस आमदारांना बदनाम करायचंय. त्यांनी एककलमी तो कार्यक्रम हाती घेतलाय, त्यांना शुभेच्छा. मात्र या आरोपांवर शेंबडं पोरगंही विश्वास ठेवणार नाही, असेही कदम म्हणाले. भेटीदरम्यान गजाभाऊंशी अनेक अशाही गप्पा झाल्या की, जे जाहीरपणे सांगता येत नाही, असेही कदम यांनी सूचकपणे म्हंटले.

Ramdas Kadam
ठाकरे गटाचा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? रामदास कदमांशी बंद दाराआड केली चर्चा

शिंदे गटाकडून गजाजन किर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली.

उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे जणू स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांनीदेखील आपला निर्णय बदलत उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in