नुपुर शर्मांना औरंगाबादच्या चौकात फाशी द्या, म्हणणाऱ्या जलीलांची आता सारवासारव

नुपूर शर्मा यांच्याविषयी एमआयएमच्या दोन खासदारांच्या विधानात एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mp Imtaiz Jalil
Mp Imtaiz JalilSarkarnama

औरंगाबाद : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे वादळ अजून थांबलेलं दिसत नाही. शर्मा यांच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jalil) यांनी प्रक्षोभक भाषा वापरली होती. नुपूर शर्मा यांना फाशी द्या, असे ते म्हणाले होते.

शुक्रवारी औरंगाबाद येथे विरोध प्रदर्शित करताना जलील म्हणाले होते की, 'नुपूर शर्मा यांना याच औरंगाबादच्या चौकात फाशी द्या,' जलील यांच्या या प्रक्षोभक विधानानंतर ते अडचणीत आले आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्याविषयी एमआयएमच्या दोन खासदारांच्या विधानात एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mp Imtaiz Jalil
शरद पवार राष्ट्रपतींच्या खूर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल!

नुपूर शर्मा यांच्याविषयी केलेले विधान कायदेशीर दृष्ट्या अडचणीचे ठरु शकतं हे लक्षात येताच जलील यांनी आपल्या विधानाची सारवासारव केली. ते म्हणाले, "नुपुर शर्माला कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षा झाली पाहिजे," जलील हे माध्यमांशी बोलत होते.

इम्तियाज जलील यांच्या आधीच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनीही सारवासारव केली. "नुपुर शर्माने प्रेषित मोहम्मदाचा अपमान केला आहे. भाजपने त्यांना नुसते निलंबित करून भागणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. भाजपनं शर्मांवर वेळेवर कारवाई न केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे, असा आरोप ओवैसी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com