Amol Kolhe News : आघाडीने बहिष्कार टाकलेल्या शिंदेंच्या बैठकीला कोल्हे एकटेच हजर; राजकीय चर्चा जोरात...

Ncp Mp Amol Kolhe News : संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातली सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलवली होती.
Mp Amol Kolhe News
Mp Amol Kolhe NewsSarkarnama

Cm Eknath Shinde meeting : संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातली सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी बहिष्कार टाकला होता. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आम्ही बैठकीला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, या बैठकीला शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या खासदारांपैकी शिंदे यांच्या बैठकीला फक्त अमोल कोल्हेच उपस्थित होते, त्यामुळे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि खासदार उपस्थित होते.

Mp Amol Kolhe News
Shivsena Symbol News : ठाकरेंनी आयोगात केली शिंदेंची कोंडी; लेखी युक्तीवाद सादर करत उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

या बैठकीमध्ये कोल्हे यांनी पुणे-नाशिक रेल्वेचा विषय मांडला. यावेळी अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, मी बैठकीमध्ये मतदार संघातील विषय मांडले. रेल्वेचा विषय मांडला. ही बैठक आधी व्हायला हवी होती, असेही कोल्हे यांनी सांगितले. ही बैठक वेळेवर मुख्यमंत्र्यांनी बैलावली होती. त्यामुळे अनेक खासदारांना बैठकीला येता आले नाही, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला आघाडीच्या खासदारांपैकी कोल्हेच उपस्थित होते, त्यामुळे याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कोल्हे यांनी दरम्यानच्या काळात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारली होती. मात्र, शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थिती लावली. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत.

Mp Amol Kolhe News
Shivsena Symbol News : ठाकरे गटाचा युक्तीवाद सादर; शिंदे गटाची अखेरच्या क्षणी धावपळ : अन्...

दरम्यान, आजच्या खासदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही, कारण सध्या या बैठकीची चेष्ठा सुरू असून मुख्यमंत्री शिंदे यांनी या परंपरेला काळीमा फासला आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. हा सगळा फार्स आहे ही बैठक यापूर्वीच नियोजित केली होती. मात्र, कुठल्या कारणास्तवती रद्द केली हेसुद्धा आम्हाला सांगण्यात आले नाही, असेही राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com