सुधा मूर्तींमधली आई दिसते : उद्धव ठाकरे

टाटा मेमोरियल सेंटरच्या 'आशा' धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी खुले झाले आहे.
CM Uddhav Thackeray- Sudha Murthy
CM Uddhav Thackeray- Sudha Murthy

मुंबई:  नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथे इन्फोसिस फाऊंडेशनने (Infosys Foundation) बांधलेल्या 'आशा' (ASHA)  निवास धर्मशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. खारघर येथे बांधण्यात आलेल्या या  १३ मजली इमारतीत एकूण २६० खोल्या आहेत.  दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्‍या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती (Sudha murthy) यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, उपस्थित होते.

CM Uddhav Thackeray- Sudha Murthy
गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य!

आजपासून राज्यातली मंदिरे खुली होत असली तरी टाटा मेमोरियल सेंटरच्या 'आशा' धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी खुले झाले आहे. या प्रसंगी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती  यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे.  महाराष्ट्राच्या कन्या सुधा मूर्ती यांच्यातील आई आपल्याला दिसत असते, अशा शब्दातं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. सुधा मुर्ती या  महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील “आई” आज आपल्याला पहायला मिळाली,  असंही त्यांना यावेळी म्हटलं. सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांचा जोडा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.  श्रीमती मुर्ती यांची दातृत्वाची वृत्ती  विरळ आहे. जेंव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेंव्हा  नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. मात्र तेवढ्यावरच न थांबता त्यांना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना देखील त्यांनी जपली.

आज जरी मंदिरे खुली होत असली तरी संकटाच्या काळात डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, आपल्या सोबत वावरत होते. कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईत किंवा इतर मोठ्या शहरात जाणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी ते मिळेल तिथे राहतात, त्यांच्यासाठी हा आशा' निवास  खुप महत्वाचा आधार ठरेल. राज्यशासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत असताना टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याने या कामाला अधिक बळकटी मिळते. सुधा मुर्तींची पुस्तके ही केवळ चाळता येणारी नाहीत, त्यात कुठलाही कल्पनाविलास नसतो. तर अनुभवातून आलेला संदेश आणि विचार असतात. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होणार असल्याचे यावेळी सुधा मुर्ती यांनी नमुद केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचही सुधा मुर्ती यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com