Devendra Fadnavis : पहाटेचा शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच; फडणवीसांच्या दाव्याने राज्यात खळबळ

Sharad Pawar : अजित पवार बोलेले तर बाकीचं सांगण्याचाही केला दावा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis News : भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात दीड दिवसाचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर या पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे बडे नेते बोलणे टाळत आले आहेत. आज मात्र या शपथविधीप्रकरणी फडणवीस यांनी अत्यंत खळबळजनक विधान केलं आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत मध्यंतरी वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार (Jayant Patil) यांनी वक्तव्ये केली होती. जयंत पवार यांनी त्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज खुद्द फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह मोठी खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis
Sushil Kumar Shinde News : सुशीलकुमार शिंदेच सोलापूर लोकसभेचे उमेदवार? : ‘जनवात्सल्य’वर हालचाली वाढल्या; नेत्यांसोबत खलबतं

फडणवीस म्हणाले. "त्या शपथविधीबाबत आमची चर्चा पवारसाहेबांशी झालेली होती. बाकी सगळ्या गोष्टी अजित पवारांना विचारा, मला का विचारता." यानंतर अजित पवार याबाबत बोलणं टाळतात, त्यामुळं तुम्हीच सांगा असं विचारण्यात आले. त्यावर, "ज्यावेळी अजित पवार बोलतील त्यानंतर मी सविस्तर सांगेन," असाही दावा फडणवीस केला.

Devendra Fadnavis
भारत जोडो यात्रेचा असाही परिणाम; मतभेद विसरुन गेहलोत-पायलट पुन्हा एकत्र

भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. दीड दिवसानंतर हे सरकार विसर्जित झाले होते. या सरकार स्थापन होऊन राज्यासह देशात राजकीय भूकंप झाला होता. मात्र या प्रकरणी आजपर्यंत ना फडणवीस बोलत होते ना अजित पवार.

Devendra Fadnavis
Kasba By-Election : चंद्रकांतदादांनी कसब्याची निवडणूक लईच मनावर घेतली; कोथरुडमधून मुक्कामच हलवला

आता त्या दीड दिवसाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसच बोलले आहेत. पहाटेचा शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं’, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com