मूड महाराष्ट्राचा : आज निवडणुका झाल्यास मुंबईचा बालेकिल्ला शिवसेना राखणार

आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे
Mood of Maharashtra
Mood of Maharashtra Sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. यात मुंबईत कल शिवसेनेकडेच(Shivsena) राहील, असे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या बालेकिल्ल्यावरील वर्चस्व कायम ठेवेल, असे चित्र सर्वेक्षणात दिसत आहे.

महाविकास आघाडी(Maha Vikas Aghadi) सरकारला दोन वर्षे झाली आहे. राज्याच्या इतिहासातील ही एक आगळी घडामोड होती. दोन वर्षे सरकार टिकेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. तीन पक्षांचे सरकार शंका लोकांना मान्य होईल का, अशीही शक्यता व्यक्त होत होती. आता सरकारला दोन वर्षे झाली याबद्दल जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील सर्व घटकांचा कल जाणून घेतला आहे.

मुंबई कल शिवसेनेकडेच राहील, असे सर्वेक्षणात समोर आले आहे. आजच्या आज निवडणुका झाल्यास भाजप आणि शिवसेनेकडे मतदारांचा कल आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत लढण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेला सर्वाधिक नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यात कोविड काळात निर्णय घेण्यास झालेला विलंब, रखडलेले प्रकल्प हे प्रमुख कारण आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फटका काँग्रेसला सर्वाधिक बसण्याची शक्यता आहे.

Mood of Maharashtra
मूड महाराष्ट्राचा : सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप सगळ्यात मोठा पक्ष

सध्या ३६ पैकी काँग्रेसचे चार आमदार असून त्यातील तीन आमदार अल्पसंख्याक आहेत. अल्पसंख्याक समाजापुरती काँग्रेस आगामी निवडणुकीत मर्यादित राहण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फारसे महत्त्व नसेल. मनसेमुळे मराठीबहुल मतदारसंघात शिवसेनेला फटका बसेल. तर वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

Mood of Maharashtra
आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी उडविणार भाजपचा धुव्वा!

एमआयएममुळे समाजवादी पक्षालाही त्यांचा एक आमदार टिकवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. शिवसेनेला भांडूप, विक्रोळी, चेंबूर, कुर्ला, अंधेरी पूर्व, दिंडोशी या मतदारसंघात मनसेचा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मालाड पश्चिम, वांद्रे पूर्व, मुंबादेवी या मतदार संघात आणि शिवाजीनगर-मानखुर्द या मतदार संघात समाजवादी पक्षाला एमआयएमचा फटका बसू शकेल. धारावी येथे काँग्रेसला वंचित आघाडीचा फटका बसू शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com