अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांची अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल

सचिन वाझे यांच्या माध्यमातून ४.७० कोटी रुपयांची रक्कम हृषिकेश यांनी वडिलांसोबत हवालामार्फत वळवली, असाही दावा ईडीनं केला आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा मुलगा हृषिकेश (hrishikesh deshmukh) यांनी अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए कोर्टात याचिका दाखल केली आहे. (anil deshmukh news update)

या याचिकेवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. मनी लाँन्ड्रिग प्रकरणी (Money Laundering) त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोप केला आहे. न्यायालयाने हृषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

Anil Deshmukh
काँग्रेसला 'एक व्यक्ती-एक पद' चा विसर ; संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी दाखवली केराची टोपली !

हृषिकेश याचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता आणि त्याने वडिलांना बेकायदा कमावलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यास मदत केली होती, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात केला आहे.

Anil Deshmukh
फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी ; हाच खेळ त्यांच्यावर उलटू शकतो !

आतापर्यंतच्या तपासात देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नियंत्रणाखाली ११ कंपन्या असल्याचे उघड झाले आहे. त्यातील बहुतांशी कंपन्यांमध्ये हृषिकेश संचालक किंवा समभागधारक आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेली ४.७० कोटी रुपयांची रक्कम हृषिकेशने वडिलांसोबत हवालामार्फत वळवली, असाही दावा ईडीनं केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com