लकडावालांकडून कोणी किती पैसे घेतले? मी यादी देतो; कंबोज यांचे वळसे पाटलांना आव्हान

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
लकडावालांकडून कोणी किती पैसे घेतले? मी यादी देतो; कंबोज यांचे वळसे पाटलांना आव्हान
Mohit Kambojsarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता राणा यांची चौकशी करणार का असा राऊत यांनी केला होता. त्यावर आता भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका करत युसूफ लकडावाला यांचे लाभार्थी कोण आहेत? याची यादी पाठवणार असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात मोहित कंबोज यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''युसूफ लकडावाला यांचे लाभार्थी कोण आहेत? मी पुराव्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यादी देतो. माझा ही जबाब घ्या, वास्तविकता सर्वांना कळली पाहिजे! कोणी किती आणि कधी घेतले?'' असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

Mohit Kamboj
दिल्लीप्रमाणे राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न : पवारांचा गंभीर आरोप

दरम्यान, याआधीच्या ट्वीटमध्ये कंबोज यांनी काँग्रेसचे माजी खासदार अहमद पटेल, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या सगळ्यांचे युसूफ लकडावाला यांच्याशी चांगले संबंध होते, असा आरोप केला होता. संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. सलीम जावेदच्या गोष्टी आता राऊत यांनी बंद कराव्या. ज्यांना काही कळत नाही त्यांना राज्यसभेचे इतके वर्ष खासदार कसे काय केले हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती, असा टोलाही कंबोज यांनी लगावला होता. युसुफ लकडावाला यांच्याकडून राणा दांपत्याने हा फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटचे पैसे त्यांनी लकडावाला यांना दिले, असेही कंबोज यांनी सांगितले होते.

Mohit Kamboj
भास्कर जाधवांनी अजितदादांसमोर शब्द दिला आणि शिवसैनिक बिथरले...

उगाच दोन मिनीटांसाठी खालच्या पातळीवर राजकारण करणारे राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचे स्व:ताचे घोटाळे बाहेर आले प्रॅापर्टी जप्त झाली. त्याबद्दल काय बोलणार, युसूफ लकडावाला आणि संजय राऊत यांचेही चांगले संबंध होते. महाबळेश्वरच्या हॅाटेलवर राऊत अनेकदा जाऊन राहतात, असा आरोप कंबोज यांनी केले आहे. मातोश्रीवर त्यांचे नेहमीच येणे जाणे असते त्याबद्दल काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांना स्व:ताच्याच विधानवरून माघार घ्यावी लागेल. राऊत हे पवारांची खुर्ची उचलतात तर मग त्यांनी लकडावालांची खुर्ची उचलली असेल. ची चौकशी करायची आहे तर करा ना कोणी अडवले, मात्र तक्रारदार कोण आहेत, असा सवाल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.