रश्मी शुक्ला महाराष्ट्रात परतणार? कंबोज यांच्यासोबत घेतली फडणवीसांची भेट

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्वीट करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती
Mohit Kamboj, Rashmi Shukla, Devendra Fadnavis
Mohit Kamboj, Rashmi Shukla, Devendra Fadnavissarkarnama

Devendra Fadnavis : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांबद्दल ट्विट करुन खळबळ उडवून देणारे भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. तर, फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या देखील फडणवीसांना भेटण्याासाठी गेल्या होत्या. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

कंबोज यांनी मंगळवारी रात्री सलग तीन ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत इशारा दिला होता. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेच्या दरम्यान फोन टॅपिंग केल्याचा आरोप असणाऱ्या रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने नेमके काय चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Mohit Kamboj, Rashmi Shukla, Devendra Fadnavis
मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के, ते पुराव्याशिवाय बोलत नाहीत...

शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. आता शुक्ला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या. त्यामुळे शुक्ला महाराष्ट्रात पुन्हा परत येणार का याबाबत तर्क वितर्क सुरु झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतो हा अहवाल त्यांनी तयार केला होता. हा अहवाल लिक झाल्याने रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले होते. फडणवीस सरकारच्या काळात शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. आरोप झाल्यानंतर शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या.

Mohit Kamboj, Rashmi Shukla, Devendra Fadnavis
MP Supriya Sule : सुप्रिया सुळेंना यासाठी झाली नितीन गडकरींची आठवण…

कंबोज यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याबद्दल ट्विट केले. कंबोज यांनी नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरु करण्याची मागणी केली होती. कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. मलिक, देशमुख, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर आणखी एक नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in