मोदींचे ‘अग्निपथ’ तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
Congress
CongressSarkarnama

मुंबई - भारतातील सैन्यभरतीसाठी केंद्रातील मोदी सरकारने 'अग्निपथ'ही नवी योजना आणली आहे. या योजनेचा बेरोजगार युवकांकडून जोरदार विरोध होत आहे. या योजनेचा मुद्द घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. Congress movement News

ही योजना रद्द करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. या आंदोलनात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरुण यांच्यासह सामान्य जनतेनेही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सिंदखेडराजा, करवीर, राजुरासह सर्व भागात आंदोलन करण्यात आले.

Congress
'अग्निपथ' विरोधात काँग्रेस पेटविणार आंदोलनाची मशाल : नाना पटोले म्हणाले...

नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकार देशातील तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असून लष्करात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तरुणांसह काँग्रेस पक्षाच तीव्र विरोध आहे. अग्निपथ योजना आणून देशसेवेच्या व्रताला काळिमा फासण्याचे आणि बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे, असे पटोले यांनी सांगितले.

Congress
लष्कराचे कंत्राटीकरण करणारी ‘अग्निपथ’ योजना मागे घ्या!

ते पुढे म्हणाले की, अग्निपथ योजना ही सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करू पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न धुळीस मिळवणारी आहे. या योजनेला तरुणांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारी आहे तसेच चार वर्ष नोकरी केल्यानंतर या जवानांना पुन्हा नोकरीसाठी भटकावे लागणार आहे. जवानांचा असा अपमान काँग्रेसला कदापि सहन होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com