Deepak Kesarkar गौप्यस्फोट : मोदी-ठाकरेंच सर्व ठरलं होतं! पण ते प्रकरण घडलं आणि...

Uddhav Thackeray| Narendra Modi| सुशांतसिंग प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली.
Dipak Kesarkar
Dipak Kesarkar

मुंबई : सुशांतसिंग प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) बदनामी केली गेली. यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही (Narayan Rane) सहभाग होता. नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- आदित्य ठाकरेंच्या बदनामीने ठाकरे कुटूंब नाराज

नारायण राणेंकडून आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठाकरें कुटुंबियांवर प्रेम करणारे आम्ही अनेक आमदार दुखावले गेलो होतो. मी स्वत: काही भाजप नेत्यांशी संपर्क साधला. एखाद्याची बदनामी करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म कसा वापरू देता असे विचारले तेव्हा अनेक नेत्यांनी सांगितले की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा तऱ्हेच्या बदनामीला विरोध आहे. अशा प्रकारे एखाद्या तरुणाला मोठे राजकीय भवितव्य असताना त्याची अशी बदनामी होणे योग्य नाही. त्यानंतर मी स्वत माझे पर्सनल कॉन्टॅक्ट वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.

- आमदारांच्या निलंबनामुळे मोदी-ठाकरेंमधील बोलणी फिस्कटली

त्यानंतर मोदी व ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. त्यांची भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या. याच काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले आणि हे प्रकरण आणखीनच बिघडलं. त्यात केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंचा समावेश करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या बदनामीने आधीच दुखावलेले ठाकरे कुटूंब यामुळे आणखी दुखावले गेले. यामुळे पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बोलणीही फिस्कटली.

- शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही याबाबत माहिती होतं

दोन महिन्यांनी उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली, तेव्हा अशा लहान लहान गोष्टी होत असतात. आपली पुन्हा बोलणी सुरु होतील आणि काहीतरी चांगलं निष्पन्न होईल, असं त्यांनी मला सांगितलं. दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याही कानावर मी या गोष्टी घातल्या, त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन आपण भाजपसोबत जाण्याची मागणी करत होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई, अनिल देसाई यांनाही या गोष्टींची कल्पना दिली होती.

-शिंदेंना बाजूला ठेवून ठाकरे भाजपसोबत युतीला तयार

ज्यावेळी आम्ही आसामला निघुन गेलो होतो तेव्हाही आम्ही त्यांच्याकडे झालं गेलं विसरुन जाऊ, आपण एकत्र येऊ अशी विनंती करत होतो. पण तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बाजुला ठेवा आम्ही तुमच्यासोबत युती करायला तयार असल्याचं भाजपला ऑफर दिली होती, पण या गोष्टीला ना भाजप तयार होती ना आम्ही आमदार तयार होतो. कारण हे योग्य ठरलं नसतं, असंही केसरकर यांनी नमुद केलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com