मोदी यांची मोठी घोषणा ; तीनही कृषी कायदे मागे घेणार

''तीन कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांनी सांगितले.

मोदी यांची मोठी घोषणा ; तीनही कृषी कायदे मागे घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांनी तीनही कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा आज केली. देशातील नागरिकांशी मोदी यांनी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली.

''तीन कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल., या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू,'' असे मोदी यांनी सांगितलं.

''शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत, अनेक सुविधा दिल्या. कृषी बजेट पहिल्यापेक्षा पाच पट वाढवलं आहे. चार वर्षात १ लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली,''असे मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवसेनेला श्रेय न मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानेच केला `गेम`

मोदी (pm Narendra Modi) म्हणाले, ''१० कोटी पेक्षा अधिक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ३ कायदे केले होते. १ लाख ६४ हजार कोटी रुपयांचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले. सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला,''

''आम्ही केवळ एमएसपी वाढवली नाही, तर विक्रमी सरकारी खरेदी केंद्रेही निर्माण केली. आपल्या सरकारने केलेल्या मालाच्या खरेदीने गेल्या अनेक दशकांचा विक्रम मोडला आहे. सरकारने आत्तापर्यंत १ लाख ६४ हजार कोटी रुपयांचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे,'' असे मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in