नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतायंत : पृथ्वीराज चव्हाण

त्यामुळे मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. ते असे का वागतात, असा प्रश्न उपस्थित करून मोदी यांचे अन्य राज्य व तेथील लोकांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही श्री. चव्हाण यांनी लक्ष वेधून प्रश्न उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतायंत : पृथ्वीराज चव्हाण
Modi is acting as the Prime Minister of Gujarat: Prithviraj Chavan

कऱ्हाड : पंतप्रधान (Prime Minister) देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) केवळ गुजरातचेच (Gujrat) पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ट्विटव्दारे केली आहे. (Modi is acting as the Prime Minister of Gujarat: Prithviraj Chavan)

तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा हवाई दौरा केला. मात्र त्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीकडे फिरकले नाहीत. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी आज जोरदार टिका केली. 

नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटव्दारे केला आहे. चक्रीवादळाने देशाची पश्चिम किनारपट्टी उध्वस्त केली. त्याचा परिणाम पाच राज्यांत झाला आहे. मात्र तरीही पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा केला व आर्थिक मदत जाहीर केली आहे.

त्यामुळे मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. ते असे का वागतात, असा प्रश्न उपस्थित करून मोदी यांचे अन्य राज्य व तेथील लोकांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही श्री. चव्हाण यांनी लक्ष वेधून प्रश्न उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.