मनसेचा पुन्हा अल्टिमेटम; अन्यथा बारा तारखेनंतर बारा वाजवणार...

mns|raj thackeray| राज्यभरातील दुकाने आस्थापनांवरील फलक हा मराठी भाषेतला असावा यासाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.
मनसेचा पुन्हा अल्टिमेटम; अन्यथा बारा तारखेनंतर बारा वाजवणार...

कल्याण : महापालिकेने दुकाने आस्थापनांनांवरील प्रमुख नामफलक मराठीत लावण्याबाबतच्या सूचना दुकानदार आणि आस्थपनाना दिला होता. मात्र अद्याप बहुतांश दुकानांवरील प्रमुख नामफलक इंग्रजीमध्येच दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले. यात येत्या १२ तारखेपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत, अन्यथा बारा तारखेनंतर बारा वाजवणार, असा इशाराच मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.

पालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच नामफलक मराठीत न लावल्यास कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा शहरातील दुकानदारांना दिला होता. मात्र अद्यापही कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानदारांचे प्रमुख नामफलक  इंग्लिशमध्ये दिसून येत आहेत.

मनसेचा पुन्हा अल्टिमेटम; अन्यथा बारा तारखेनंतर बारा वाजवणार...
शिवद्रोही छिंदम बंधूंसह 11 जण हद्दपार : नगरच्या पोलिसांची कारवाई

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी अद्याप कारवाई सुरू करण्यात आलेले नाही.याबाबत कल्याण मधील मनसे पदाधिकारी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केलं. यावेळी मराठी पाट्यांबाबत पालिकेला १२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून अन्यथा मराठी पाट्या न लावल्यास बारा वाजवण्याचा असा इशारा भोईर यांनी दिला.

दरम्यान, 13 वर्षांपूर्वी मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेतली होती. मुंबईतील दुकाने, सरकारी कार्यालयांवरील पाट्या मराठी भाषेतूनच असाव्यात, यासाठी मनसे चांगलीच आक्रमक झाली होती. त्यासाठी आंदोलनही केलं. अनेकदा खळ्ळ खट्याक् चा इशाराही दिला. मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मुंबईतील दुकानांवरील इंग्रजी अक्षरातील पाट्या काढून आंदोलनही केलं, पण काही दिवसातच त्यांची ही भूमिका थंड पडली, पण इंग्रजी भाषेतील पाट्या बदलल्या नाहीत. त्यानंतर 2022 मध्ये म्हणजे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने मराठी पाट्यांसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर मनसेला जाग आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हा राज्य सरकारचा हा निर्णय आपल्याच मागणीचं फलित असल्याचं म्हणत आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in