MNS : 'मला डावललं जातयं' म्हणणाऱ्या वसंत मोरेंची नाराजी दूर होईल का?

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेत वसंत मोरे बोलतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, पण त्यांचे भाषण झाले नाही.
Vasant More News, MNS News, Political News Updates, Pune Latest Marathi News
Vasant More News, MNS News, Political News Updates, Pune Latest Marathi Newssarkarnama

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांना पुणे मनसे (mns) शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष करण्यात आले आहे. काही दिवसापासून पुण्यातील कार्यकर्त्यांवर वसंत मोरे (vasant more) नाराज असल्याची चर्चा आहे. (Vasant More News)

येत्या शनिवारी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. या बैठकीला वसंत मोरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोरे आपली खंत मांडणार का, त्यांची नाराजी दूर होणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. (Pune Latest Marathi News)

मुंबईतील रंग शारदा सभागृहात शनिवारी होणाऱ्या मनसेचे होणाऱ्या बैठकीस राज ठाकरे (raj thackeray) उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पुण्यातून मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस अजय शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Vasant More News, MNS News, Political News Updates, Pune Latest Marathi News
BREAKING : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

मनसेचे पु्ण्यातील काही कार्यकर्ते वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे दिसते. "मला डावललं जातयं," अशी प्रतिक्रिया मोरे यांनी नुकतीच दिली होती. पुण्यात नुकतीच राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांना "तुम्ही अजूनही नाराज आहात का?" असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावेळी वसंत मोरे यांनी हसत यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, "घरातील भांडण आहेत, ती बसून मिटवायचे असे कुणाला वाटत असेल तर बसून ते सर्व मिटेल, नाराज असण्याचे काही कारण नाही," मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार,असेही मोरे म्हणाले होते.

Vasant More News, MNS News, Political News Updates, Pune Latest Marathi News
संभाजीराजेंशी राऊत, देसाई, घडाघडा बोललेच नाहीत, नार्वेकरांनी विषयच संपविला!

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेत वसंत मोरे बोलतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, पण त्यांचे भाषण झाले नाही. त्यानंतर मोरेंनी 'तात्या' (वसंत मोरे) योग्य वेळी बोलतात आणि सर्व त्याचे ऐकतात, असे म्हटलं होतं. त्यानंतर आता शनिवारी होणाऱ्या बैठकीत ते काय बोलणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com