राजसाहेबांनी लोकांच्या समस्या सोडवायच्या अन् तुम्ही काय फक्त टेंडर मधलं कमिशन खाणार?

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
aditya thackeray, Sandeep Deshpande
aditya thackeray, Sandeep Deshpandesarkarnama

मुंबई : मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray)यांनी महाविकास आघाडी सरकारला ३ मेपर्यंत मुदत दिली आहे. त्यावरुन सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे. मनसे आणि शिवसेना (shivsena) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे.

'3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. यानंतर माझ्यासह आम्ही सगळे अंगावर केसेस घेण्यासाठी तयार आहोत' असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

ठाकरे म्हणाले, ''जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..''

aditya thackeray, Sandeep Deshpande
नवा आदेश : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणखी लांबणीवर..

या भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला असा शाब्दिक चिमटा मनसेला गुरुवारी काढला. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, देशात आणि राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहे, ते देखील त्या भोंग्यावर, भोंग्याच्या आवाजात सांगा. या टीकेला आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी टि्वटवरुन टोला लगावला आहे.

''महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

aditya thackeray, Sandeep Deshpande
भोंग्यावरुन मनसेत खिंडार ; ३५ जणांची सोडचिट्टी, राजीनामा सत्र सुरुच

मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत राज्यात मनसे (mns)'खळखट्याक' करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.

मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com