Dasara Melava : टोमणे,शिव्याच असतील तर मेळाव्याला काय अर्थ ? ; बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेंच मांडतात..

Dasara Melava : मशिदीवरील अनधिकृत भोंगा, अनधिकृत मदरसे, मराठी माणसे मुंबईतून का बाहेर चालले या विषयावर बोलणार का ?
Dasara Melava latest news
Dasara Melava latest newssarkarnama

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava 2022) घेण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (23 सप्टेंबर) निकाल दिला. या निकालानुसार 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी वापरण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई हायकोर्टाने दिली आहे. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचा आव्वाज पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात घुमणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "माझं आव्हान तुमची मशिदीवरील अनधिकृत भोंगा, अनधिकृत मदरसे, मराठी माणसे मुंबईतून का बाहेर चालले या विषयावर बोलणार का" असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Dasara Melava latest news
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन राजकारण पेटलं ; राष्ट्रवादी शिंदे गटाचं सर्व कसं OK करणार, पोलिसात तक्रार

संदीप देशपांडे, "अभिनंदन पण मैदानात वारसा कोणाचा विचार मांडणार, टोमणे शिव्याच असतील तर मेळाव्याला काय अर्थ. माझं आव्हान तुमची मशिदीवरील अनधिकृत भोंगा, अनधिकृत मदरसे, मराठी माणसे मुंबईतून का बाहेर चालले या विषयावर बोलणार का, या सगळ्यावर बोललात तर बाळासाहेबांचे विचार मांडण्यासारख होईल,"

"बाळासाहेबांचा विचार कोणी मांडत असेल तर ते राज ठाकरेच. 6 तारखेपासून राज साहेबांचा कोकण दौरा असेल पक्षवाढीसाठी काम करू," असे देशपांडे म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिवसेना आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोश केला आहे. 'निकालानंतर तरी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या वाटेत काळी मांजरे सोडण्याचे उद्योग बंद करावे,' असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. "सत्याचाच विजय होतो,'अशा भावना मनिषा कायंदे आणि शिवसेना प्रवक्त्या सुष्मा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com