अजितदादांनी अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ; राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
अजितदादांनी अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ; राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचे प्रत्युत्तर
Sandeep Deshpande, ajit pawarsarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी गुरुवारी टीका केली होती. त्याला मनसेचे (mns) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते कल्याण येथे माध्यमांशी बोलत होते. (Sandeep Deshpande latest news)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना कोरोना झाल्यावर टीका केली होती. "मास्क वापरत नाही, आता दुसऱ्यांना कोरोना झाला, ऑपरेशन देखील रखडले," असे पवार म्हणाले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या विधानाचा समाचार देशपांडे यांनी घेतला आहे.

"उपमुख्यमंत्री मास्क घालून फिरतात, त्यांनाही कोरोना झाला. राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये," असा टोमणा देशपांडेंनी अजित पवारांना लगावला.

Sandeep Deshpande, ajit pawar
प्रत्येकवेळी हिंदूंनी गोळ्या खायच्या का ? संरक्षण देणे शक्य नसेल तर बंदुका द्या ; मनसे आक्रमक

जम्मू काश्मीरमध्ये दोन बिगर काश्मिरींची हत्या झाली. या घटनेवर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काश्मिरी पंडितांची हत्येवरुन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. तेथील हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. ते गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का ? असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. ते कल्याण येथे बोलत होते.

Sandeep Deshpande, ajit pawar
घोडेबाजारासाठी पैसा कुठून येतो ? ; आमदारांना प्रलोभन दाखवणारे सुत्रधार कोण ?

ते म्हणाले, "हिंदूंना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का ? हिंदूंना मारणाऱ्याकडे विना परवान्याचे शस्त्र असतील तर आम्हाला बंदुका आणि परवाने द्या, स्वसंरक्षण करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला आहे. प्रत्येकाला संरक्षण देणे केंद्र सरकारला शक्य नसेल तर बंदुका तरी द्या. प्रत्येक वेळी हिंदूंनी काय गोळ्या खायच्या का?"

काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांचे हत्या सत्र सुरु आहे. केंद्र सरकारने येथील हिंदूंना शस्त्र परवाने देऊन हाती बंदुका द्याव्यात अशी मागणी ट्विटरद्वारे त्यांनी सरकारकडे केली होती. याविषयी त्यांनी पुन्हा कल्याणमध्ये केंद्र सरकारला टार्गेट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in