MNS : शिवसेनेला सत्तेचा माज आलायं.., जे पेरलं तेच उगवतयं ; मनसेनं डिवचलं

Sandeep Deshpande : "दादर, माहिम, प्रभादेवी हा एक सुसंस्कृत मतदारसंघ आहे. अशा पद्धतीच्या हाणामाऱ्या करायला हा काही बिहार नाही.
Uddhav Thakrey & Sandeep Deshpande
Uddhav Thakrey & Sandeep DeshpandeSarkarnama

मुंबई : प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने शिवसेना (shiv sena) आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते शनिवारी रात्री आमनेसामने आल्याने राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. याप्रकरणी दादर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच जणांना अटक केली. या प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) शिवसेनेला डिवचलं आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) म्हणाले, "दादर, माहिम, प्रभादेवी हा एक सुसंस्कृत मतदारसंघ आहे. अशा पद्धतीच्या हाणामाऱ्या करायला हा काही बिहार नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी. आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलय तेच आता उगवतय," देशपांडे माध्यमांशी बोलत होते.

"लोकांवर त्यांनी खोट्या केसेस दाखल केल्या. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावर आणि संतोषवर पोलिस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून केस दाखल करण्यात आली होती. त्या महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे?" असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Uddhav Thakrey & Sandeep Deshpande
Thackeray vs. Shinde : ठाकरे - शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

"आता जे पेरलय ते उगवेल. तुम्हाला सत्तेचा माज होता. आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. कोरोना काळात लोकांचे हाल सुरु असताना त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात आली. मात्र अशाप्रकारच्या हाणामाऱ्या चुकीच्या आहेत.याची पोलिसांनी दक्षता घ्यावी," असेही देशपांडे यांनी नमूद केले.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध दादर पोलिस घेत आहेत. पाच जणांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

या राड्याच्या वेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता थोडक्यात वाचला, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com